बारामतीत सहा दुकानांवर कारवाई.. पुढील सात दिवस राहणार सीलबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:12 AM2021-04-07T04:12:01+5:302021-04-07T04:12:01+5:30

आज प्रशासनाने कारवाई केलेल्या आस्थापनांमध्ये इंदापूर चौकातील राजहंस वाईन्स, भिगवन रोड वरील अजिंक्य बिग बाजार, नीरा रोड वरील के ...

Action on six shops in Baramati .. will remain sealed for next seven days | बारामतीत सहा दुकानांवर कारवाई.. पुढील सात दिवस राहणार सीलबंद

बारामतीत सहा दुकानांवर कारवाई.. पुढील सात दिवस राहणार सीलबंद

Next

आज प्रशासनाने कारवाई केलेल्या आस्थापनांमध्ये इंदापूर चौकातील राजहंस वाईन्स, भिगवन रोड वरील अजिंक्य बिग बाजार, नीरा रोड वरील के मार्ट किराणा बाजार मॉल, इंदापूर चौक जुनी मंडई येथील धुपरे भेळ, पंचायत समिती येथील भारत बेकरी, राम गल्ली येथील नोबल वॉच अँड मोबाईल शॉपी. यांचा समावेश आहे.

पुणे जिल्ह्यासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. बारामतीत ही मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढती कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध आस्थापना सुरू ठेवण्याबाबत काही नियम घालून दिले आहेत. यामध्ये सामाजिक अंतर राखणे, पाच पेक्षा जास्त नागरिकांनी एका ठिकाणी गर्दी न करणे, मास्कचा वापर करणे, आधी अनुषंगिक नियम घालून दिले आहेत. मात्र पाच पेक्षा अधिक नागरिक एकत्रित आढळून आल्याने बारामती शहरातील वरील आस्थापनांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. ही आस्थापने पुढील सात दिवस सील करण्यात आले आहे. ही आस्थापने पुढील सात दिवस बंद राहतील याची खात्री करावी असे आदेश मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनां विरुद्ध नियमानुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश बारामती शहर पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहेत.

Web Title: Action on six shops in Baramati .. will remain sealed for next seven days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.