मजुरांना लुबाडणाऱ्या २२ पोलीसांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:13 AM2021-04-30T04:13:20+5:302021-04-30T04:13:20+5:30

पुणे : कोरोनाच्या धास्तीमुळे गावाला निघालेल्या परप्रांतीय मजुरांना लुबाडणाऱ्या २२ पोलीसांवर लोहमार्ग पोलीस अधीक्षकांनी कारवाई केली आहे. या मजुरांना ...

Action taken against 22 policemen for robbing workers | मजुरांना लुबाडणाऱ्या २२ पोलीसांवर कारवाई

मजुरांना लुबाडणाऱ्या २२ पोलीसांवर कारवाई

Next

पुणे : कोरोनाच्या धास्तीमुळे गावाला निघालेल्या परप्रांतीय मजुरांना लुबाडणाऱ्या २२ पोलीसांवर लोहमार्ग पोलीस अधीक्षकांनी कारवाई केली आहे. या मजुरांना धमकावून त्यांचे पैसे काढून घेतले जात होते. त्यांची बदली करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनच्या भीतीने परप्रांतीय मजूर आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर गर्दी करीत आहेत. या मजुरांना फलाट तीनच्या पादचारी पुलाच्या जिन्याखाली मोकळ्या जागेत नेऊन कारवाईची भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे काढून घेण्याच्या घटनेत वाढ होत होती. मंगळवारी नगरसेवक वसंत मोरे यांनी याचे चित्रण देखील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सादर केले. त्याची दखल घेऊन बुधवारी ही कारवाई केली.

कोट

गरीब प्रवाशांकडून पोलिसांनी पैसे काढून घेणे हा खूप गंभीर प्रकार आहे. त्यांची केवळ बदली करून चालणार त्यांच्यावर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे.

- निखिल काची, विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य, पुणे

कोट

परप्रांतीय मजुरांना लोहमार्ग पोलीस त्रास देत असल्याची तक्रारी मिळाल्या होत्या. त्यामुळे मी स्वतः दोन दिवस वेषांतर करून पुणे स्थानकावर फिरत होतो. पोलीसांवर कारवाई करण्यात आल्याने या प्रकारांना आळा बसणार आहे.

- वसंत मोरे, नगरसेवक

Web Title: Action taken against 22 policemen for robbing workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.