वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर कारवाई; वाळू माफियांना पन्नास लाखाला दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 19:54 IST2025-01-10T19:54:19+5:302025-01-10T19:54:40+5:30

वाळू माफियांना पन्नास लाखांचा दणका दिला.

Action taken against sand mining boats; Sand mafia fined Rs 50 lakh | वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर कारवाई; वाळू माफियांना पन्नास लाखाला दणका

वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर कारवाई; वाळू माफियांना पन्नास लाखाला दणका

इंदापूर : महसूल विभाग व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील कांदलगाव पासून करमाळा तालुक्याच्या हद्दीपर्यंत पाठलाग करुन वाळू उपसा करणाऱ्या सहा बोटी पकडून त्या पाण्यात बुडवून नष्ट करत वाळू माफियांना पन्नास लाखांचा दणका दिला.

आज दुपारी साडेतीन ते साडेपाच या वेळात झालेल्या या कारवाईत तहसीलदार जीवन बनसोडे, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, निवासी नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे, इंदापूरचे मंडळ अधिकारी श्याम झोडगे, माळवाडीचे मंडळ अधिकारी औदुंबर शिंदे, ग्राम महसूल अधिकारी अशोक पोळ, वैभव मुळे, भास्कर घोळवे, मनीषा पोळ,राजश्री ढमे, वृषाली कारंडे, पोलीस कर्मचारी लक्ष्मण सूर्यवंशी,दत्तू जाधव यांनी भाग घेतला. 
 

Web Title: Action taken against sand mining boats; Sand mafia fined Rs 50 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.