‘त्या’ नगरसेवकांवरील कारवाई योग्यच

By admin | Published: April 23, 2017 04:17 AM2017-04-23T04:17:36+5:302017-04-23T04:17:36+5:30

महापालिका सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभागृहाचे संकेत पायदळी तुडविण्याचा प्रयत्न केला. महापौरांच्या दिशने झाडाची कुंडी फेकण्याचा प्रकार घडला.

The action taken against those 'corporators' is right | ‘त्या’ नगरसेवकांवरील कारवाई योग्यच

‘त्या’ नगरसेवकांवरील कारवाई योग्यच

Next

पिंपरी : महापालिका सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभागृहाचे संकेत पायदळी तुडविण्याचा प्रयत्न केला. महापौरांच्या दिशने झाडाची कुंडी फेकण्याचा प्रकार घडला. सुदैवाने कोणाला इजा झाली नाही. सभागृहात असे कृत्य करणाऱ्यांविरुद्ध महापौर नितीन काळजे तसेच सहकाऱ्यांनी कारवाईची भूमिका घेतली. हे योग्यच आहे. कारवाईबाबत कायदेशीर तरतूद काय आहे, या पेक्षा घटना घडली त्या वेळी त्यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे, असे समर्थन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.
ते म्हणाले, सभागृहात शिस्तीचे पालन झालेच पाहिजे. आम्हीही विरोधी पक्षात असताना, आंदोलने केली आहेत. विधानसभेत १९ आमदारांवर निलंबनाची कारवाई झाली होती. येथे केवळ चार नगरसेवकांवर कारवाई केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना, त्यांनी जशी मनमानी केली. तसा प्रकार घडणार नाही.
विरोधी पक्षात काम करताना भाजपाने कधी कोणत्याही राजकीय पक्षांच्या कार्यक्रमावेळी आंदोलने केलेली नाहीत. कोणीही असो आपल्या मागण्यांसाठी लोकशाही मार्गाचा वापर केला पाहिजे. रीतसर मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यावे. पक्षाच्या कार्यक्रमावेळी त्याठिकाणी आंदोलन करण्याचा वेगळाच पायंडा पाडण्याचा काही जण प्रयत्न करीत आहेत, अशी प्रथा पाडू नये. (प्रतिनिधी)

पुण्यात नुकसान भरपाई दिली
पुणे महापालिकेत भाजपाच्या स्वीकृत सदस्य निवडीवरून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ केला. महापालिकेचे नुकसाने झाले, ते भाजपातर्फे भरून दिले जाईल, झाल्या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल.

Web Title: The action taken against those 'corporators' is right

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.