लोहगाव विमानतळावर ९७ लाखांचे सोने पकडले, सीमाशुल्क विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 06:40 AM2017-12-21T06:40:22+5:302017-12-21T06:40:47+5:30

अबुधाबी येथून आलेल्या प्रवाशाकडून ४़३७१ किलोचे अठरा कॅरेटचे ९७ लाख रुपये किमतीचे सोने हवाईदलाच्या सीमाशुल्क विभागाच्या अधिका-यांनी लोहगाव विमानतळावर पकडले.

 Action taken by the customs department, caught 9 7 lakh gold at Lohagaon airport | लोहगाव विमानतळावर ९७ लाखांचे सोने पकडले, सीमाशुल्क विभागाची कारवाई

लोहगाव विमानतळावर ९७ लाखांचे सोने पकडले, सीमाशुल्क विभागाची कारवाई

googlenewsNext

पुणे : अबुधाबी येथून आलेल्या प्रवाशाकडून ४़३७१ किलोचे अठरा कॅरेटचे ९७ लाख रुपये किमतीचे सोने हवाईदलाच्या सीमाशुल्क विभागाच्या अधिका-यांनी लोहगाव विमानतळावर पकडले.
सैफुला नासर दुदगावे (रा. कोल्हापूर) याच्याकडे हे सोने सापडले. बुधवारी दुपारी ४ वाजून २५ मिनिटांनी अबुधाबीहून येणारे जेट एअरवेजचे विमान लोहगाव विमानतळावर उतरले. सुरुवातीला तो सुरक्षितपणे तपास यंत्रणेमधून बाहेर पडला; मात्र त्याच्या हालचाली सीमाशुल्क विभागाच्या अधिकाºयांना संशयस्पाद वाटल्याने त्याला चौकशीसाठी थांबविण्यात आले. त्याच्या सामानाची कसून तपासणी केली असता त्यामध्ये धातूच्या वस्तू आढळ्ल्या. शिलाई मशिन आणि इस्त्रीमध्ये त्याने सोने लपवून आणल्याचे आढळले. या सोन्याची किंमत जवळपास ९७ लाख रुपये इतकी आहे. स्मगलिंग केलेले हे सोने जकात चुकविण्याच्या उद्देशाने त्याने आणल्याचे समोर आले आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सीमाशुल्क विभागाचे उपायुक्त भारत नवले यांनी सांगितले.

Web Title:  Action taken by the customs department, caught 9 7 lakh gold at Lohagaon airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.