कडक निर्बंध असूनही घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:10 AM2021-05-08T04:10:18+5:302021-05-08T04:10:18+5:30

नागरिकांनी स्वतःच घराबाहेर न पडण्यासाठी बंधने घालून घेणे सर्वांच्याच हिताचे आहे. हडपसर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अधिकारी-कर्मचारी नागरिकांमध्ये प्रबोधन करीत ...

Action on those who leave the house despite strict restrictions | कडक निर्बंध असूनही घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई

कडक निर्बंध असूनही घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई

Next

नागरिकांनी स्वतःच घराबाहेर न पडण्यासाठी बंधने घालून घेणे सर्वांच्याच हिताचे आहे. हडपसर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अधिकारी-कर्मचारी नागरिकांमध्ये प्रबोधन करीत आहेत. फुरसुंगी, अण्णासाहेब मगर महाविद्यालय, ससाणेनगर, हडपसर गाडीतळ या ठिकाणी नाकाबंदी दरम्यान नागरिकांमध्ये प्रबोधन केले जात आहे. रात्री-अपरात्री अडलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत आहे.

कारवाईसाठी सहायक पोलीस निरीक्षक विकास राऊत, रत्नदीप गायकवाड, विश्वास भाबड, मनोज पाटील, सचिन थोरात, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जाधव, सागर पोमण, पोलीस शिपाई श्याम येवले, सागर दळवी, हनुमंत दुधभाते, चेतन साळुंखे, रवींद्र बारटक्के यांचे पथक कार्यरत आहे.

कदम म्हणाले की, नागरिक घराबाहेर पडण्यासाठी औषध आणायचे आहे, स्कॅनिंग करायचे आहे, बँकेत पैसे भरायचे आहेत, नातेवाइकाला हॉस्पिटलमध्ये पैसे द्यायचे आहेत, रक्त द्यायचे आहे, केबल दुरुस्त करायची आहे, इंटरनेट बंद पडले आहे, सोनोग्राफी करण्यासाठी चाललो आहे, नातेवाईक दवाखान्यात आहेत, डॉक्टरांनी पैसे भरण्यासाठी बोलावले आहे, असे एक ना अनेक कारणे सांगत आहेत.

--

नागरिकांनी रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, कामाशिवाय घराबाहेर पडू नका, दूध-भाजीपाला, किराणा मालाची दुकाने, औषधांच्या दुकानामध्ये गर्दी करू नका, असे सांगत नागरिकांमध्ये प्रबोधन करीत आहे, असे हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी सांगितले.

Web Title: Action on those who leave the house despite strict restrictions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.