अवैध वाळूवाहतूक प्रकरणी दोन ट्रकवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:10 AM2021-05-26T04:10:13+5:302021-05-26T04:10:13+5:30
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.२४) रोजी सांयकाळी सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना काझड भागात वाळूची अवैध वाहतूक ...
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.२४) रोजी सांयकाळी सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना काझड भागात वाळूची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली. मिळताच त्यांनी फौजदार नितीन लकडे आणि कर्मचा-यांना कारवाई करण्याची सूचना केली. काझड गावच्या हद्दीत अकोले रस्त्यावर खरात वस्ती येथे वाहने दिसली असता यावेळी छापा टाकला. त्यामध्ये चार ब्रास वाळू व दोन हायवा ट्रक अवैधपणे वाळूची वाहतूक करताना आढळून आले. एक पांढरा रंगाचा टाटा कंपनीचा हायवा ट्रक (एमएच १२ क्यूजी ८२०३) आणि एक लाल रंगाचा टाटा कंपनीचा बेळगाव बॉडी कॅबिन नावाचा ट्रक (एमएच ४२ टी ३७१५) आणि प्रत्येकी ४ ब्रास वाळू असा २०,८०,००० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
अल्लाऊद्दिन खैरुद्दिन शेख (सध्या रा. वाटलुज ता. दौंड), संतोष पूर्ण नाव नाही (रा. मलठण, ता. दौंड), राजू शेंडगे (रा. वाटलुज, ता. दौंड), नितीन सुनील लवंगारे (रा. मलठण, ता. दौंड, जि. पुणे) यांचेविरुद्ध भारतीय दंडसंहिता व पर्यावरण अधिनियमन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, फौजदार नितीन लकडे, रमेश शिंदे, गोलांडे, जगताप, होमगार्ड पिसाळ यांनी पार पाडली. पुढील तपास फौजदार नितीन लकडे हे करीत आहेत.
————————————————