Pune Crime: हडपसर परिसरातील सात जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 05:59 PM2023-11-07T17:59:48+5:302023-11-07T18:00:12+5:30

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली....

Action under mcoca against seven people in Hadapsar area | Pune Crime: हडपसर परिसरातील सात जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांची कारवाई

Pune Crime: हडपसर परिसरातील सात जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांची कारवाई

हडपसर (पुणे) : हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगार बाबू नामदेव मिरेकर याच्यासह टोळीतील ७ साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

आरोपी बाबू नामदेव मिरेकर, (वय ५४, वैदुवाडी, हडपसर, पुणे (टोळी प्रमुख), आकाश हनुमंत कांबळे, (वय २०, रा. सदर, अमन नवीन शेख, वय २३, रा. गोसावी वस्ती, हडपसर,) सरताज नबीलाल शेख, (वय २०, रा. वैदवाडी, हडपसर) सनी रावसाहेब कांबळे, वय २३, रा. मिरेकर वस्ती, शंकर मठ, वैदवाडी पुणे) रोहित शंकर हनुवते वय २२, रा. नवीन म्हाडा बिल्डिंग, हडपसर, पुणे (टोळी सदस्य) दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली असून, ०३ विधीसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, दाखल गुन्ह्याचा हडपसर पोलिस व गुन्हे शाखा युनिट ०५ हे समांतर तपास करीत असताना, त्यांना मिळालेल्या बातमीवरून व सापळा लावून दाखल गुन्ह्यातील आरोपींना व तीन विधीसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अधिक तपास करीत असताना बाबू नामदेव मिरेकर टोळीविरुद्ध गंभीर दुखापत, मालमत्तेचे नुकसान, नागरिकांमध्ये दहशत माजविणे, प्राणघातक शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

त्यानुसार पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी पोलिस उपायुक्त परिमंडळ ०५ चे विक्रांत देशमुख यांचेमार्फत अपर पोलिस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केलेला होता. रंजनकुमार शर्मा यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून मोका कारवाईस मान्यता दिली. गुन्ह्याचा तपास हडपसर विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त अश्विनी राख करत आहेत.

ही कामगिरी हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद शेळके, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे, संदीप शिवले, सहायक पोलिस निरीक्षक सारिका जगताप, प्रमोद दोरकर, पोलिस अंमलदार, प्रवीण शिंदे, महेश उबाळे, राजश्री खरे, वसीम शेख, गिरीश एकोर्गे, बाबा शिंदे, रामश्वेर नवले यांनी केलेली आहे.

Web Title: Action under mcoca against seven people in Hadapsar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.