शहरातील अनफिट वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 03:58 AM2017-08-01T03:58:07+5:302017-08-01T03:58:07+5:30
अत्यंत जुनाट भासणा-या आणि केव्हाही मान टाकेल अशा गाड्यांमधून कच-याची वाहतूक करताना महापालिकेच्या गाड्या सर्रास दिसतात.
पिंपरी : अत्यंत जुनाट भासणा-या आणि केव्हाही मान टाकेल अशा गाड्यांमधून कच-याची वाहतूक करताना महापालिकेच्या गाड्या सर्रास दिसतात. या गाड्या खरेच वाहतुकीस सक्षम आहेत, की नाही, असा प्रश्न पडावा, अशी स्थिती या गाड्यांची असते. या गाड्यांबाबतच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन अखेर प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) या वाहनांची तपासणी करून, कारवाईचे आदेश भरारीपथकाला दिले आहेत.
आारटीओच्या वतीने अवजड वाहने, रिक्षांची क्षमता तपासणी (फिटनेस) करून घेणे बंधनकारक असते. या क्षमता चाचणीत दोष आढळल्यास ते दुरुस्त करणे बंधनकारक असते. आवश्यकता भासल्यास संबंधित वाहन पुढे तोडले (स्क्रॅप) देखील जाते. शहरात
कचरा वाहतूक करणाºया
गाड्यांकडे पाहिल्यास बहुतांश कंटेनर आणि कचरा वाहतूक करणाºया गाड्यांनी अशी कोणती तपासणी केलीच नसेल, असे दिसते. समजा अशी तपासणी केली असल्यास दोष नक्की दूर केले नसतील, असे वाहनांच्या स्थितीवरून दिसून येते.