बोगस डॉक्टरांवर कारवाई होणार
By Admin | Published: December 9, 2014 11:36 PM2014-12-09T23:36:59+5:302014-12-09T23:36:59+5:30
जिल्ह्यात सुळसुळाट झालेल्या बोगस डॉक्टरांच्या पाश्र्वभूमीवर बारामती तालुका आणि परिसरात असणा:या बोगस ‘डॉक्टरांवर’ कारवाई करण्यासाठी तालुकास्तरीय समिती नेमण्यात आली आहे.
बारामती : जिल्ह्यात सुळसुळाट झालेल्या बोगस डॉक्टरांच्या पाश्र्वभूमीवर बारामती तालुका आणि परिसरात असणा:या बोगस ‘डॉक्टरांवर’ कारवाई करण्यासाठी तालुकास्तरीय समिती नेमण्यात आली आहे. ही समिती तालुक्यातील बोगस डॉक्टरांवर नजर ठेवणार आहे. गावोगावी खासगी आरोग्य सेवा पुरविणा:या डॉक्टरांची माहितीही समिती संकलित करणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश जगताप यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
अधिक माहिती देताना डॉ. जगताप म्हणाले, ‘‘या समितीचे अध्यक्ष गटविकास अधिकारी राहुल काळभोर असतील. या तालुकास्तरीय समितीची पहिली बैठक पुढील आठवडय़ात होणार आहे. तीत गटविकास अधिका:यांसोबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश जगताप यांच्यासेाबतच संपूर्ण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी तसेच तालुक्यातील पोलीस ठाण्यातील प्रभारी प्रमुख यांचा सदस्य म्हणून समावेश असेल.
याअंतर्गत बेागस डॉक्टरांवर ‘एफआयआर’ दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर खटले दाखल करण्यात येणार आहेत. याबाबत नागरिकांनी आपल्या कार्यक्षेत्रतील प्राथमिक ओराग्य केंद्रातील वैद्यकीय अधिका:यांच्या निर्दशनास आणून देण्याचे आवाहन डॉ. जगताप यांनी केले आहे. तालुक्यात 97 ग्रामपंचायती आहेत, तर 9 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. या गावांमध्ये आरोग्य कर्मचारी बोगस डॉक्टरांबाबत पाहणी करतील. त्यानंतर संबंधित गावातील वैद्यकीय अधिकारी अहवाल सादर करतील. गावातील डॉक्टरांचे शैक्षणिक प्रमाणपत्र तपासण्यात येणार आहे. (वार्ताहर)
या बोगस डॉक्टरांवर एफआयआर दाखल करण्यात येऊन त्यांची ‘प्रॅक्टिस’ बंद करण्यात येणार आहे. या संदर्भात नागरिकांनी आपल्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिका:यांशी संपर्क साधावा.
- डॉ. महेश जगताप
तालुका वैद्यकीय अधिकारी