माथेरानमध्ये टॅक्सी, अश्वचालकांवर कारवाई
By admin | Published: May 8, 2017 04:35 AM2017-05-08T04:35:00+5:302017-05-08T04:35:00+5:30
माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या टॅक्सी स्टँड व घोडा स्टँड येथे माथेरान पोलीस प्रशासनाने टॅक्सी चालक व अश्व चालक यांच्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
माथेरान : माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या टॅक्सी स्टँड व घोडा स्टँड येथे माथेरान पोलीस प्रशासनाने टॅक्सी चालक व अश्व चालक यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. यामध्ये अश्वचालकांवर विनापरवाना घोडे हाकणे, अश्वचालकाचा गणवेश न घालणे, परवाना स्वत: जवळ न बाळगणे, तसेच दस्तुरी नाक्यावर पर्यटकांची होत असलेली फसवणूक आदी प्रकारांमुळे कारवाई केली, तर टॅक्सीची कागदपत्रे नसणे, परवाना जवळ न बाळगणे, गाडीवर व्हीआयपीचे फलक लावणे, काचा काळ्या ठेवल्याबद्दल कारवाई करण्यात आली.
विकेंडला माथेरानमध्ये प्रवासी संख्या जास्त असते आणि या वेळेत टॅक्सी स्टँड येथे एका ओमनीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक बसविणे आदी तक्रारी वाढत आहेत, तसेच दस्तुरी नाक्यावर घोडेवाले पर्यटकांची आर्थिक फसवणूक करीत होते, अशा तक्र ारी वाढत होत्या. त्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजवर्धन खेबुडे, पोलीस शिपाई आण्णासाहेब मेटकरी, भाऊ आघान, दत्तात्रेय किसवे, अमोल पाटील, पोलीस नाईक महेंद्र राठोड, पोलीस हवालदार राजेंद्र झांजे यांनी कारवाई केली. चालकांवर प्रत्येकी २ हजार रु पये दंड ठोठावला.