पुणेकरांनो काळजी घ्या! शहरातील कोरोनाबाधित सक्रिय रुग्णसंख्या एक हजाराच्या पुढे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 12:16 PM2021-12-29T12:16:52+5:302021-12-29T12:27:38+5:30

दिवसभरात ४ हजार ७०१ जणांनी कोरोना चाचणी

active corona cases in pune city exceeds one thousand omicron | पुणेकरांनो काळजी घ्या! शहरातील कोरोनाबाधित सक्रिय रुग्णसंख्या एक हजाराच्या पुढे

पुणेकरांनो काळजी घ्या! शहरातील कोरोनाबाधित सक्रिय रुग्णसंख्या एक हजाराच्या पुढे

Next

पुणे : शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून दररोज शंभरच्या पुढे असताना, मंगळवारी पुण्यातील कोरोनाबाधितांची सक्रिय रुग्णसंख्या ही १ हजार ६९ वर गेली आहे़ शहरात १८ ऑक्टोबर, २०२१ रोजी १ हजार ३ इतकी सक्रिय रुग्ण होते़ त्यानंतर सातत्याने हा आकडा कमी होत पाचशेच्या आत आला होता़ मात्र आज रुग्णसंख्या एक हजारच्या पुढे गेली असून, दिवसभरात ४ हजार ७०१ जणांनी कोरोना चाचणी करून घेतली असता तपासणीच्या तुलनेत बाधितांची टक्केवारी ३़६३ टक्के इतकी आढळून आली आहे़

शहरात आज १७१ कोरोनाबाधित आढळून आले असून, ९१ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे आज एकजणाचा मृत्यू झाला आहे़ सध्या विविध रुग्णालयांत सध्या ८५ गंभीर रुग्णांवर तर ५७ रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत़ शहरात आतापर्यंत ३८ लाख ४५ हजार ४०९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यांतील ५ लाख ९ हजार २७६ जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यांपैकी ४ लाख ९९ हजार ९२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत शहरात ९ हजार ११५ जणांचा मृत्यू झाला आहे.

महापालिकेच्या १७४ केंद्रांवर आज (दि. २९) प्रत्येकी २५० कोविशिल्ड लस उपलब्ध करून दिली आहे. तर ससून रुग्णालयासह महापालिकेच्या ११ रुग्णालयांमध्ये प्रत्येकी ५०० कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

दरम्यान, उपलब्ध लसीच्या साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना ५ टक्के लस ही ऑनलाईन बुकिंगद्वारे, तर ५ टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे. तर लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ४५ टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना (६ ऑक्टोबरपूर्वी लस घेतलेल्यांना) ऑनलाईन बुकिंगद्वारे, तर ४५ टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे. तसेच कोव्हॅक्सिन लसीचा २ डिसेंबरपूर्वी पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस मिळणार आहे.लसीकरणाच्या ऑनलाईन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.

Web Title: active corona cases in pune city exceeds one thousand omicron

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.