पुणे शहरात भाजप आमदारांपुढे कार्यकर्त्यांनीच उभे केले आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 11:53 AM2019-08-30T11:53:06+5:302019-08-30T11:58:00+5:30

आमदारांना मिळालेल्या या उघड आव्हानामुळे तेही चकित झाल्याची चर्चा पक्षाच्या राजकीय वतुर्ळात मुलाखतींनंतर लगेचच सुरू झाली.

Activists challenge on front of the BJP MLAs in gthe pune city | पुणे शहरात भाजप आमदारांपुढे कार्यकर्त्यांनीच उभे केले आव्हान

पुणे शहरात भाजप आमदारांपुढे कार्यकर्त्यांनीच उभे केले आव्हान

Next
ठळक मुद्देइच्छुकांच्या मुलाखती: वहिनींना तिघांची तर काळेअण्णांना तीस जणांची स्पर्धा आमदार विजय काळे यांच्या विरोधात सर्वाधिक म्हणजे ३० जणांनी दिल्या मुलाखती

पुणे: शहरातील आठही मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांकडूनच कडवे आव्हान असल्याचे पक्षाने घेतलेल्या इच्छुकांच्या मुलाखतीत गुरूवारी स्पष्ट झाले. शिवाजीनगर मतदारसंघातील आमदार विजय काळे यांच्या विरोधात तर भर मुलाखतीतच काहीजणांनी बंडाचा झेंडा फडकावला तर शहराध्यक्ष असलेल्या माधुरी मिसाळ यांना महापालिकेतील पक्षाचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी आव्हान उभे केले आहे.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी पक्ष कार्यालयात गुरूवारी दुपारी या मुलाखती घेतल्या. आमदारांना मिळालेल्या या उघड आव्हानामुळे तेही चकित झाल्याची चर्चा पक्षाच्या राजकीय वतुर्ळात मुलाखतींनंतर लगेचच सुरू झाली. आमदार विजय काळे यांच्या विरोधात सर्वाधिक म्हणजे ३० जणांनी मुलाखती दिल्या. त्यातील तब्बल ११ जणांनी शेलार यांना आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या, पण विजय काळे यांना बदला असा ठरावच दिला असल्याचे शिवाजीनगर मतदारसंघातील मुलाखती झाल्यानंतर जाहीरपणे सांगितले. 
नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे, ज्योत्स्ना एकबोटे, निलिमा खाडे, विजय शेवाळे,या नगरसेवकांनी तसेच पक्षात नुकताच प्रवेश केलेले सुनील माने यांनीही या मतदारसंघासाठी मुलाखत दिली. त्याशिवाय उद्योजक सुधीर मांडके यांचाही मुलाखत देणाऱ्यांमध्ये समावेश आहे. या मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ३१ इच्छुकांनी मुलाखती दिल्या.
खुद्द पक्षाच्या शहराध्यक्ष आमदार मिसाळ यांनाही त्यांच्या पर्वती मतदारसंघात तीन नगरसेवकांनी आव्हान उभे केले आहे. त्यात महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्याशिवाय नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, स्विकृत नगरसेवक गोपाळ चिंतल यांनीही मुलाखत दिली. मिसाळ यांच्याशिवाय एकूण ३ जणांनी या मतदारसंघात मुलाखती दिल्या व तिघेही नगरसेवक आहेत.
कसबा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला समजला जातो. तब्बल ५ वेळा इथून आमदार झालेले गिरीश बापट खासदार झाल्यामुळे हा मतदारसंघ रिक्त आहे. त्यांच्या स्नुषा स्वरदा बापट यांनी त्यावर दावा केला आहे, मात्र त्या परदेशात असल्यामुळे मुलाखतीला उपस्थित नव्हत्या. महापौर मुक्ता टिळक यांनीही इथून उमेदवारी मागितली आहे. त्याशिवाय गणेश बीडकर, महेश लडकत, धीरज घाटे, हेमंत रासने या आजी नगरसेवकांसह अशोक येनपुरे, दिलीप काळोखे या माजी नगरसेवकांनी व मनिष साळुंके यांनी उमेदवारी मागितली आहे. 
कोथरूड मतदारसंघातील आमदार मेधा कुलकर्णी यांनाही पालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांनी आव्हान उभे केले आहे. या मतदारसंघात एकूण १२ जणांनी मुलाखती दिल्या. त्यात मोहोळ यांच्याशिवाय नगरसेवक मंजूषा खर्डेकर, त्यांचे पती संदीप खर्डेकर, सुशिल मेंगडे, अमोल बालवडकर या नगरसेवकांचा समावेश आहे.
खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्याशिवाय दिलीप वेडेपाटील, प्रसन्न जगताप, राजाभाऊ लायगुडे या नगरसेवकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. एकूण १२ जणांनी या मतदारसंघात मुलाखती दिल्या.
कॅन्टोन्मेट विधानसभा मतदारसंघात माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे हे आमदार आहेत. तिथे २२ जणांनी मुलाखती दिल्या. तिथे एकाही नगरसेवकाने उमेदवारी मागितलेली नाही, मात्र पाटबंधारे खात्यात अभियंते असलेले पांडूरंग शेलार यांचा मुलाखत देणाºयांमध्ये समावेश आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघातील आमदार योगेश टिळेकर यांना नगरसेवक मारूती तुपे, उमेश गायकवाड यांनी आव्हान दिले आहे. या मतदारसंघात ९ जणांनी मुलाखत दिली.
वडगाव शेरी मतदारसंघातील आमदार जगदीश मुळीक यांना संजय पवार, उषा वाजपेयी, महेंद्र गलांडे, राजेश लोकरे यांनी आव्हान दिले आहे. 

Web Title: Activists challenge on front of the BJP MLAs in gthe pune city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.