भोसरीमधील औषधी उद्यान वाचविण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 05:50 PM2020-12-23T17:50:16+5:302020-12-23T17:50:25+5:30
आयुक्त श्रावण हर्डीकर यांची निमा संघटनेचे पदाधिकारी व प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासोबत भेट घेतली.
पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील भोसरी एमआयडीसीमधील औषधी उद्यान वाचविण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. निमा संघटना आणि नाम फाऊंडेशन च्या पदाधिकारी समवेत आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. एमआयडीसी ने खासगी विकसकास दिलेला भूखंड रद्द करावा अशी मागणी केली आहे.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांची निमा संघटनेचे पदाधिकारी व प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासोबत भेट घेतली. पिंपरी-चिंचवडमधील निमा संघटनेसाठी दिलेला भूखंड ज्यावर शेकडो वृक्ष लावलेली आहेत. तो भूखंड महापालिकेचा असताना एमआयडीसीने परस्पर विक्री केलेला आहे. तो भूखंड परत निमा संघटनेला मिळावा व तेथील वृक्ष संवर्धन व्हावे, म्हणून आयुक्तांसह सोबत चर्चा केली. यावेळी नाम फाऊंडेशनचे अमित गोरखे, सिटीझन फोरमचे धनजय शेडबाले, तुषार शिंदे, नगरसेविका अनुराधा गोरखे, निमा संघटनेचे डॉ. महेश पाटील,डॉ अभय तांबिले उपस्थित होते