Sindhu Tai Sapkal चित्रपट बघून त्या कायम म्हणायच्या 'मी हे आयुष्य जगले आहे पण तू मला जिवंत केलंस', तेजस्विनी पंडित भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 11:22 AM2022-01-05T11:22:05+5:302022-01-05T11:22:23+5:30

पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्याबरोबरच अनेकांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून भावनिक पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली

actor tejaswini pandit written a facebook post related to sindhu tai sapkal | Sindhu Tai Sapkal चित्रपट बघून त्या कायम म्हणायच्या 'मी हे आयुष्य जगले आहे पण तू मला जिवंत केलंस', तेजस्विनी पंडित भावुक

Sindhu Tai Sapkal चित्रपट बघून त्या कायम म्हणायच्या 'मी हे आयुष्य जगले आहे पण तू मला जिवंत केलंस', तेजस्विनी पंडित भावुक

googlenewsNext

पुणे : अनाथांची माय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे काल पुण्यात निधन झाले. गॅलेक्सी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अशा अचानक सोडून जाण्याने संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. राजकीय नेते, अभिनेते, सिंधुताईंच्या संपर्कातील हजारो व्यक्तींना एक धक्काच बसला आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्याबरोबरच अनेकांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून भावनिक पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. सिंधुताईंच्या जीवनावर आधारित 'मी सिंधुताई सपकाळ' या चित्रपटात ताईंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी फेसबुकवर भावनिक पोस्ट लिहिली आहे. चित्रपट बघून कायम म्हणायच्या 'मी हे आयुष्य जगले आहे पण तू मला जिवंत केलंस', अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली आहे. 

''अनेक आंतराष्ट्रीय, राष्ट्रीय पुरस्कार आम्ही पटकावले. अभिमान वाटतो की ज्या कलाक्षेत्रात मी काम करते. त्यातून माईंचं हे महान कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा खारी चा का असेना पण मला वाटा उचलता आला. आणि एक व्यक्ति म्हणून त्यांचा तो अविस्मरणीय प्रवास मी स्क्रीन वर जगू शकले त्यातून बरेच काही शिकू शकले ह्याचा आनंद आहे. परकाया प्रवेश म्हणतात ना तेच ! कळत नकळत खूप काही दिलं तुम्ही मला माई. महाराष्ट्र तुमच्या जाण्याने पोरका झाला...! पण माझ्यासाठी तुम्ही जिवंतच असाल. आणि तुमच्यावर आधारित असलेला चित्रपट तुमच्या लढवय्या वृत्तीची, तुमच्या संघर्षाची ग्वाही, प्रेरणा माझ्या रूपी देत राहील अशी भावना पंडित यांनी व्यक्त केली आहे.''   

"मी हे आयुष्य जगले आहे पण तू मला जिवंत केलंस''

रात्री ममता ताईच्या फोनवरुन बातमी कन्फर्म झाल्यावर काही क्षण पायातली ताकदच गेली. थक्क झाले होते. खूप वेळ फोन वाजत होता. प्रतिक्रियेसाठी.काही जड छातीने उचलले, काही नाही उचलता आले....कारण ती वेळ खरंच नाजूक होती. माई आणि मी रोज संपर्कात होतो का तर नाही....पण तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती येऊन जाते, की तुमचं आयुष्यच बदलून जातं आणि ह्यात त्यांचा हातभार आहे ह्याचं त्यांना भान ही नसतं.  चित्रपटानंतर काही वेळा त्यांना भेटण्याचा योग आला....कधीच कुणाला नावाने हाक न मारता "बाळा" म्हणणार्‍या माईंना माझं नाव मात्र पाठ होतं. हातात हात घेऊन माझी पाठ थोपटायच्या. मला चित्रपट बघून कायम म्हणायच्या "मी हे आयुष्य जगले आहे पण तू मला जिवंत केलंस अशी आठवणही त्यांनी सांगितली.

ममता बाल सदन च्या कुटुंबाला ह्या अवघड परिस्थितीशी लढण्याची ताकद देवो

''घाई घाई ने RIP लिहिण्याच्या ह्या जगात त्यांचंही एक कुटुंब आहे. (आणि ते खूप मोठं आहे) ते अत्यंत अवघड परिस्थितीतून जात आहे. ह्याचा आपल्याला विसर पडण्याची शक्यता आहे. त्यांना वेळ द्या. Let them atleast have some time to mourn on a family members death. तब्येत बरी नसल्यामुळे उद्या त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जाता येणार नाही पण ईश्वर चरणी प्रार्थना- माईंच्या आत्म्यास शांती लाभो. आणि ममता ताई, दीपक दादा, ममता बाल सदन च्या कुटुंबाला ह्या अवघड परिस्थितीशी लढण्याची ताकद देवो अशी प्रार्थना पंडित यांनी केली आहे.''  

Web Title: actor tejaswini pandit written a facebook post related to sindhu tai sapkal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.