अभिनेते, साहित्यिकांनी दिली चिमुकल्यांसाठी पुस्तके भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:10 AM2021-04-02T04:10:41+5:302021-04-02T04:10:41+5:30

पुणे : जागतिक बाल पुस्तक दिन (२ एप्रिल) रोजी साजरा होणार असून, त्यानिमित्त घरोघरी असावी ग्रंथसंपदा हा उपक्रम कर्वेनगर ...

Actors, writers gave books for Chimukalya | अभिनेते, साहित्यिकांनी दिली चिमुकल्यांसाठी पुस्तके भेट

अभिनेते, साहित्यिकांनी दिली चिमुकल्यांसाठी पुस्तके भेट

Next

पुणे : जागतिक बाल पुस्तक दिन (२ एप्रिल) रोजी साजरा होणार असून, त्यानिमित्त घरोघरी असावी ग्रंथसंपदा हा उपक्रम कर्वेनगर परिसरात साजरा करण्यात आला. यासाठी अभिनेते डॉ. गिरीश ओक, गायिका जयश्री रानडे, ग्रंथप्रेमी सनदी लेखापाल सुरेश रानडे, स्वा. सावरकर अभ्यासक सु. ह. जोशी, साहित्यिक भारत सासणे, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी पुस्तके भेट दिली आहेत. या दिग्गजांची पुस्तके चिमुकल्यांच्या हाती गेली असून, त्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे.

उपक्रमाच्या माध्यमातून शहराच्या विविध भागातील शिक्षण संस्था, वस्ती, सोसायटी येथील मुलांना सातशे गोष्टींच्या पुस्तकांचे कोविडच्या नियमांचे पालन करत वाटप केले. वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी कार्यरत असलेल्या संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे यांनी उपक्रमाचे आयोजन केले. जगातील पहिला परिकथाक हँन्स ख्रिस्तीयन अँडरसन याच्या जन्मदिनानिमित्त जगभरात २ एप्रिल हा दिवस ‘बाल पुस्तक दिन’ म्हणून साजरा होतो. त्या निमित्ताने कर्वेनगर परिसरातील अभिजात एज्युकेशन सोसायटीच्या परिसरात पुस्तक भेट कार्यक्रम प्रसंगी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे, मुख्याध्यापिका पूर्वा म्हाळगी, पर्यवेक्षिका मंजिरी जाधव, सुनील वाटवे, मानसी कुलकर्णी आदी उपस्थित होते. अभिजात शाळेसोबतच, अत्रे प्रशाला, वंचित विकास, स्वरूपवर्धिनी, अशा अन्य संस्था, शाखा तसेच भीमनगरवस्ती परिसरातील मुले व त्यांचे पालकांना गोष्टींच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी भडसावळे म्हणाले, ‘‘कोविड काळात शाळा नाही, खेळ नाही. आॅनलाईन शिक्षण यात अडकलेली मुले, त्यांचे कुटुंबीय पाहता मुलांना वाचनासाठी प्रेरित करण्यास हाच काळ योग्य असल्याची जाणीव झाल्याने ‘घरोघरी असावी ग्रंथसंपदा’ उपक्रमास प्रारंभ केला. यात मुलांना आवडतील अशी ज्ञान व मनोरंजनात्मक पुस्तके भेट देण्यात येतात. गेल्या सहा महिन्यांत पाच हजार मुलांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे.’

Web Title: Actors, writers gave books for Chimukalya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.