नव्या प्रभागरचनेला प्रत्यक्षात आक्षेप कमीच
By admin | Published: October 24, 2016 01:41 AM2016-10-24T01:41:51+5:302016-10-24T01:41:51+5:30
भागरचना तयार करताना मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप करून प्रभागांची मोडतोड करण्यात आल्याच्या तक्रारी राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या होत्या
पुणे : प्रभागरचना तयार करताना मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप करून प्रभागांची मोडतोड करण्यात आल्याच्या तक्रारी राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या होत्या. मात्र आतापर्यंत हरकती नोंदविण्यास फारसा प्रतिसाद मिळालेला नसून, केवळ १३२ हरकती प्रशासनाला प्राप्त झालेल्या आहेत. आता हरकती नोंदविण्यासाठी केवळ शेवटचे दोन दिवस (२५ आॅक्टोबर पर्यंत) उरले आहेत.
आगामी महापालिका निवडणूक ४ सदस्यांचा एक प्रभाग यानुसार पार पडत आहे. त्यासाठी नुकतीच प्रारूप प्रभागरचना जाहीर करण्यात आली. या प्रभागरचनेवर हरकती घेण्यासाठी १० ते २५ आॅक्टोबर ही मुदत देण्यात आलेली आहे. प्रशासनाकडे नोंदविण्यात आलेल्या हरकतींवर येत्या ४ नोव्हेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे सुनावणी घेतली
जाणार आहे. त्यानंतर बदल होतील. (प्रतिनिधी)