वाघोली येथील वाघेश्वर मंदिराच्या सौंदर्यात भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:21 AM2021-09-02T04:21:34+5:302021-09-02T04:21:34+5:30
वाघोली : वाघोली (ता. हवेली) पुरातन काळातील वाघेश्वर मंदिर असून ते पुणे-नगर महामार्गलगत असून त्याचे सुशोभीकरण करण्यात ...
वाघोली : वाघोली (ता. हवेली) पुरातन काळातील वाघेश्वर मंदिर असून ते पुणे-नगर महामार्गलगत असून त्याचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. वाघोली येथील नुकतेच 'आय लव्ह वाघोली' हे मोठ्या विद्युत रोषणाईत नाव उभारण्यात आले असून त्यांचे लोकार्पण नुकतेच शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, तसेच वडगावशेरी आमदार सुनील टिंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. हा सेल्फी पॉइंट आकर्षण ठरणार आहे. तळ्याभोवती भिंत उभारण्यात आली आहे. त्या समोरील जागेवर महामार्गलगत सुशोभीकरण करण्यात आल्याने वाघेश्वर मंदिर परिसर सौंदर्याने नटलेले असून पुणे-नगर महामार्गांने जाणारे नागरिक, वृद्ध, महिला, मुले आकर्षित होणार होताना दिसून येत आहेत. वाघोलीचे तत्कालीन उपसरपंच महेंद्र भाडाळे यांनी स्वखर्चातून 'आय लव वाघोली' व शिवशंभो अशी विद्युत रोषणाईतील दोन एलईडीमध्ये बोर्ड उभारले असून यामुळे सुशोभीकरण हे त्यांनी त्यांच्या स्वखर्चातून केले आहे. या सेल्फी पॉइंटचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, वडगावशेरी आमदार सुनील टिंगरे, वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे, माजी सरपंच जयश्री सातवपाटील, माजी जीप सदस्य रामदास दाभाडे, वाघेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र सातवपाटील, शिवदास उबाळे, उपसरपंच महेंद्र भाडळे, समीर भाडळे, कैलास सातव, बाळासाहेब सातवसह आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. महामार्गालगतच्या सुशोभीकरणाने मंदिराचे सौंदर्य अधिक खुलले असून मंदिर परिसरात लोकांची वर्दळ वाढल्याचे पाहायला मिळत आहे. मंदिर व परिसराचा जास्तीत जास्त विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे वाघेश्वर विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र सातव पाटील यांनी यावेळी सांगितले.