कष्टकऱ्यांच्या मेहनतीवर व्यसनींची पिचकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 07:43 AM2018-05-31T07:43:28+5:302018-05-31T07:43:28+5:30

वेळ सकाळी साधारण ११ वाजताची. उन्हाचा तडाखा वाढत होता

Addiction addicts on the hard work of the workers | कष्टकऱ्यांच्या मेहनतीवर व्यसनींची पिचकारी

कष्टकऱ्यांच्या मेहनतीवर व्यसनींची पिचकारी

Next

राहुल गायकवाड
पुणे : वेळ सकाळी साधारण ११ वाजताची. उन्हाचा तडाखा वाढत होता. वाहनांची संख्याही हळूहळू वाढत होती. हातात रंगाचा डबा घेऊन दुभाजकांना रंग देण्याचं काम दोघे प्रामाणिकपणे करत होते. एक एक दुभाजक ते रंगवत होते आणि काही समाजकंटक पान-गुटखा खाऊन त्या दुभाजकांवर पिचकारी मारत होते. आपल्या मेहनतीवर काही मिनिटांत मारली जाणारी पिचकारी पाहून त्यांचे मन हेलावत होते. दादा करणार तरी काय अन् बोलणार तरी कोणाला... वाईट तर वाटतं; पण आता लोकांना अडवू तर शकत नाही. आपल्या मेहनतीवर पाणी फिरल्याचं पाहत पुढे सरकत राहायचं एवढंच आमच्या नशीबात...बंडगार्डन येथे दुभाजकांना रंगकाम करणारे दोन कामगार बाळू गवळी आणि कैलास नलावडे आपली व्यथा मांडत होते.
सध्या पुण्यातील बंडगार्डन भागातील दुभाजक रंगवण्याचं काम चालू आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे एका कार्यक्रमासाठी बुधवारी पुण्यात आले होते. त्यांच्या वाहनांचा ताफा विमातळावरून याच ठिकाणावरून गेला. ‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’ हे पुण्याचे ब्रीदवाक्य राष्ट्रपतींना खरे वाटावे म्हणून खरंतर हा खटाटोप. परंतु, या रंगकाम कर्मचाºयांच्या मेहनतीवर काही समाजकंटक पाणी फिरवत असल्याचे चित्र आहे. काल निळ्या व पांढºया रंगाने रंगवलेल्या दुभाजकांना काही वाहनचालकांनी आपल्या आवडत्या लाल रंगाने रंगवले होते. हे कर्मचारी रंगकाम करत असतानाच काही वाहनचालक त्यांच्यासमोरच त्यांनी रंगवलेल्या दुभाजकांवर थुंकत होते. हे चित्र पाहण्यापलीकडे दुसरा कुठलाच उपाय त्यांच्याकडे नव्हता. रोज सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत जिवाचं रान करून हे कर्मचारी दुभाजक रंगवतात. दिवसभर राबल्यानंतर अवघे चारशे रुपये त्यांच्या हातात पडतात. परंतु, त्यांनी केलेल्या कामावर पिचकाºया मारलेल्या पाहून या कर्मचाºयांना अत्यंत दु:ख होते. पोटाची खळगी भरण्यासाठी
गपगुमान आपले काम करत राहण्याशिवाय यांच्याकडे कुठलाही पर्याय नाही.
या कर्मचाºयांचे मुकादम सुभाष साळुंखे म्हणाले, सकाळपासून हे कर्मचारी येथे दुभाजक रंगविण्याचे काम करीत आहेत. वाहने वेगात येत असताना जिवाची पर्वा न करता हे कर्मचारी काम करतात. परंतु काही लोक पिचकाºया मारुन यांच्या मेहनतीवर पाणी फिरवतात. एखाद्याला बोललं तर ते आम्हालाच दमदाटी करतात. आता थुंकणाºयांचे तोंड तर बंद करता येत नाही. त्यामुळे सहन करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही.
शहराच्या विविध भागात सारखीच परिस्थिती आहे. दुभाजकांवर पानमसाला, गुटखा खाऊन थुंकून खराब केले आहे. त्यामुळे मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाआधी स्वच्छ विचार अभियान राबविण्याची गरज असल्याचे या कर्मचाºयांचे म्हणणे आहे.

Web Title: Addiction addicts on the hard work of the workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.