पालकांकडून ट्युशन व्यतिरिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:07 AM2021-06-30T04:07:45+5:302021-06-30T04:07:45+5:30
शिक्षण उपसंचालकांचे आदेश शिक्षण उपसंचालकांचे आदेश बारामती :पुणे विभागाच्या शिक्षण उपसंचालकांनी कोविडमुळे सध्या शाळा सुरू नसल्याने पालकांकडून अनुदानित ...
शिक्षण उपसंचालकांचे आदेश
शिक्षण उपसंचालकांचे आदेश
बारामती :पुणे विभागाच्या शिक्षण उपसंचालकांनी कोविडमुळे सध्या शाळा सुरू नसल्याने पालकांकडून अनुदानित शाळांनी कोणतीही फी घेऊ नये, विनाअनुदानित, स्वंय्य अर्थसहाय्यित शाळांनीही ट्युशन फीव्यतिरिक्त अन्य कोणतीही फी वसूल करू नये, असे आदेश जिल्हा परिषद व महापालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.
ऑल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादुल मुस्लिमीनचे जिल्हाध्यक्ष फय्याज शेख यांनी शिक्षण उपसंचालकांच्या या आदेशामुळे मागणीला एआयएमआयएमच्या मागणीला यश आल्याचे सांगितले.
शेख यांनी यासंबंधी शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. अनुदानित शाळांमध्ये आरटीई-२००९च्या कायद्यानुसार शिक्षण दिले जाते. काही ठिकाणी शाळा सोडल्याचा दाखला देत नाहीत. शाळेत प्रवेश देत नाहीत, अनुदानित, खासगी शाळांकडून बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्याची पायमल्ली होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. याशिवाय विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित शाळा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवत असल्याचे निवेदनात म्हटले होते. त्यानुसार शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी जिल्हा परिषद व महापालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना यासंबंधी आदेश दिले आहेत.
————————————————