महापालिकेचा कार्यभार ‘अतिरिक्त’ खांद्यावर; शासनाचे अधिकारी महापालिकेत येण्यास अनुत्सुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 06:01 AM2018-02-14T06:01:35+5:302018-02-14T06:01:52+5:30
शहरातील तब्बल ४० लाख लोकसंख्येला मूलभूत सुविधा पुरवणाºया पुणे महापालिकेच्या कामकाजाची धुरा सध्या अतिरिक्त अधिका-यांवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. एलबीटी, करआकारणी विभाग, स्मार्ट सिटी, झोपडपट्टी, दक्षता, समाजविकास व आकाशचिन्ह विभाग, सुरक्षा अधिकारी अशा एकूण १४ ते १५ प्रमुख विभागांचा कार्यभार अतिरिक्त अधिका-यांकडे देण्यात आला आहे
- सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे : शहरातील तब्बल ४० लाख लोकसंख्येला मूलभूत सुविधा पुरवणाºया पुणे महापालिकेच्या कामकाजाची धुरा सध्या अतिरिक्त अधिका-यांवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. एलबीटी, करआकारणी विभाग, स्मार्ट सिटी, झोपडपट्टी, दक्षता, समाजविकास व आकाशचिन्ह विभाग, सुरक्षा अधिकारी अशा एकूण १४ ते १५ प्रमुख विभागांचा कार्यभार अतिरिक्त अधिका-यांकडे देण्यात आला आहे. यामुळे मूळ पदभार आणि अतिरिक्त पदभार अशा दोन्ही विभागांच्या कामावर परिणाम होत आहे. अनेक वर्षांपासून उपायुक्तांचा पदोन्नतीचा प्रलंबित विषय व शासनाचे अधिकारी येण्यास अनुत्सुक यांमुळे महापालिकेत सध्या उपायुक्तांची वानवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शासनाच्या सन २०१४च्या नवीन सेवा प्रवेश नियमावालीनुसार पुणे महापालिकेसाठी एकूण १८ उपायुक्त दर्जाचे अधिकार नियुक्त करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. यामध्ये ९ अधिकारी महापालिका सेवेतील, तर ९ उपायुक्तांच्या जागा शासनाच्या विविध विभागांतील अधिकाºयांना प्रतिनियुक्तीवर भरणे अपेक्षित आहे. सध्या पुणे महापालिकेत या १८ उपायुक्तांपैकी १० ते ११ उपायुक्तांची पदे रिक्त आहेत. महापालिका सेवेतील ४ आणि प्रतिनियुक्तीवरील ६ पदे रिक्त आहेत. महापालिकेतील ६-७ सहायक आयुक्तांचा अनेक वर्षांपासून उपायुक्तपदाच्या पदोन्नतीचा विषय प्रलंबित आहे. याबाबत वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींदेखील उदासीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या ९ उपायुक्तपदांवर थेट शासनाकडून अधिकारी नियुक्त केले जातात. परंतु, पैकीदेखील ४-५ उपायुक्तपदे सध्या रिक्त असून, महापालिकेतील राजकारणामुळे शासनाचे अधिकारी महापालिकेमध्ये येण्यास उत्सुक नाहीत.
महापालिकेच्या १८ पैकी तब्बल १० ते ११ उपायुक्तांची पदे रिक्त असल्याने अनेक अधिकाºयांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. पुणे महापालिकेचा खºया अर्थाने स्मार्ट कारभार करण्यासाठी उपायुक्तांची रिक्त पदे त्वरित भरणे गरजेचे आहेत.
यामध्ये सध्या अधिकाºयांच्या बदल्यांचा हंगाम सुरू असून, शासनाकडूून किमान प्रतिनियुक्तीवर तरी अधिकाºयांची नियुक्ती महापालिकेत होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महापालिकेच्या उत्पन्नामध्ये यंदा मोठी तूट आली आहे. यंदा तब्बल दीड हजार कोटींची करवसुली करण्याचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत केवळ सुमारे ९०० कोटी रुपयांचा कर गोळा झाला आहे. करआकारणीसारख्या प्रमुख विभागाचा, आणि स्मार्ट सिटी, भूसंपदान व व्यवस्थापन विभाग, उपायुक्त विशेष अशा एकूण ४ विभागांचा अतिरिक्त कार्यभार विभागीय कार्यालयाचे सह महापालिका आयुक्त विलास कानडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
तर, उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या एलबीटीचा पदभारदेखील ज्ञानेश्वर मोळक यांच्याकडे देण्यात आला. मूळ क्रीडा विभागाचे प्रमुख असलेले तुषार दौंडकर यांच्याकडे समाजविकास व आकाशचिन्ह विभागाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर यांच्याकडे संनियंत्रक (सुरक्षा) व प्राथमिक शिक्षण विभागाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. शहराच्या पथ विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र राऊत यांच्याकडे मुख्य अभियंता, कामगारकल्याण विभागाचे अधिकारी नितीन केंजळे यांच्याकडे सुरक्षा अधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार दिला आहे.
तर, संध्या गागरे, उमेश माळी या वॉर्ड आॅफिसर (सहायक आयुक्त) यांच्याकडे महापालिकेतील झोपडपट्टी पुनर्वसन व व्हेईकल डेपो व सुरक्षा विभागा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. तर, संपूर्ण शहराच्या आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी असलेले गणेश सोनुने यांच्याकडे वारजे वॉर्ड आॅफिसर पदाचा कार्यभार देण्यात आला आहे.