अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांच्याही बदल्यांचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2015 01:00 AM2015-04-16T01:00:21+5:302015-04-16T01:00:21+5:30

पुण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांनंतर आता अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांच्याही बदल्यांचे वेध लागले आहेत

Additional commissioner, supervisor transfers | अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांच्याही बदल्यांचे वेध

अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांच्याही बदल्यांचे वेध

Next

पुणे : पुण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांनंतर आता अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांच्याही बदल्यांचे वेध लागले आहेत. पुण्यातील काही बदल्यांनंतर उर्वरित अधिकाऱ्यांच्या बदल्या एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
पुणे पोलीस आयुक्तालयातील तीन अतिरिक्त आयुक्त आणि पाच उपायुक्तांचा दोन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे त्यांची बदली अपेक्षित आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. शहाजी सोळुंके, अतिरिक्त पोलीस आयुक्त (दक्षिण) चंद्रशेखर दैठणकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त (प्रशासन) अब्दुर रहमान यांच्यासह उपायुक्त एम. बी. तांबडे, जयंत नाईकनवरे, मनोज पाटील, राजेश बनसोडे, राजेंद्र माने यांची बदली अपेक्षित आहे. तांबडे सध्या परिमंडल एक, नाईकनवरे गुन्हे शाखा, पाटील परिमंडल चार, बनसोडे सायबर शाखा आणि माने परिमंडल तीनचे उपायुक्त म्हणून काम पाहत आहेत. नवीन बदली अधिनियमानुसार उपायुक्त आणि त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचा कार्यकाल दोन वर्षांचा करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्यामुळे एक प्रकारचा ‘गॅप’ निर्माण होणार आहे. पुणे हे एक स्वतंत्र ‘केडर’ मानले जाते. पोलीस आयुक्तालय, त्यानंतर सीआयडी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे ग्रामीण अशा पुण्यातील विभागांमध्येच काही अधिकारी फिरत राहतात. पुणे सोडायला सहसा कोणी तयार नसते. त्यामुळे अनेक अधिकारी पुणे ग्रामीण, सीआयडी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागासह एटीएसमध्ये नेमणूक होण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
पुण्यातील उपायुक्त दर्जाचे तीन अधिकारी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदासाठी जोरदार ‘लॉबिंग’ करीत आहेत. ग्रामीण अधीक्षक मनोज लोहिया यांची बदली होणार आहे. त्यांनीही मुंबई पोलीस दल किंवा दहशतवाद विरोधी पथकामध्ये बदली करण्याची विनंती शासनाकडे केली आहे. यासोबतच ग्रामीणचे अतिरिक्त अधीक्षक विजयकुमार मगर आणि रवींद्रसिंह परदेशी यांच्याही बदल्या अपेक्षित आहेत. त्यामुळे या रिक्त होणाऱ्या पदांवर बसण्यासाठी शहरातील काही उपायुक्त जोरदार प्रयत्न करीत आहेत. यासोबतच गेल्या दोन वर्षांपासून पोलीस निरीक्षकांच्या बढत्याही रखडलेल्या आहेत. त्यांचेही एसीपी प्रमोशन लवकरच निघण्याची
शक्यता आहे. (प्रतिनिधी)

४सूत्रांच्या माहितीनुसार अधिवेशन संपल्याबरोबर पहिल्याच आठवड्यात बदल्या आणि बढत्यांची यादी बाहेर काढण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील मंत्री आणि आमदारांना बदल्यांबाबत ‘प्रेस्टीज इश्यू’ न करण्याची विनंती केली आहे.
४कोणत्याही अधिकाऱ्यासाठी लॉबिंग करु नका, असेही फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितल्याची चर्चा पोलीस दलात आहे. त्यामुळे ‘क्रीम पोस्टिंग’साठी धडपडणाऱ्या अधिकाऱ्यांची अडचण झाली आहे.

४मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकूणच पोलीस खात्याच्या कामगिरीबाबत असमाधानी असल्याचे चित्र आहे. नवीन सरकार सत्तेत आल्यापासून राज्यामध्ये उद्भवलेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, कॉम्रेड गोविंद पानसरेंची हत्या, नागपूर कारागृहातून पळालेले कैदी, त्यानंतर सापडत गेलेल्या मोबाईलची मालिका, पुण्यातील टोळीयुद्ध अशा अनेक घटनांमुळे पोलिसांच्या कामावरून नाराजी आहे.

Web Title: Additional commissioner, supervisor transfers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.