पुण्यात अतिरिक्त आयुक्तांनी 'या' दुकानदारांना शिकवला चांगलाच धडा; ४८ तासांसाठी ठोकले सील 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 09:47 PM2020-09-17T21:47:27+5:302020-09-17T21:49:23+5:30

गुरूवारी महापालिका भवन परिसरातील ७ दुकाने ४८ तासांसाठी महापालिकेने सील केली आहेत.

Additional commissioners taught a good lesson to shopkeeper who not control crowd; Sealed for 48 hours | पुण्यात अतिरिक्त आयुक्तांनी 'या' दुकानदारांना शिकवला चांगलाच धडा; ४८ तासांसाठी ठोकले सील 

पुण्यात अतिरिक्त आयुक्तांनी 'या' दुकानदारांना शिकवला चांगलाच धडा; ४८ तासांसाठी ठोकले सील 

googlenewsNext
ठळक मुद्देगर्दी रोखण्यासाठी उपाययोजना न करणारी दुकाने ४८ तासांसाठी सील करण्याची कार्यवाही

पुणे : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने जारी केलेल्या आदेशाचे दुकानदारांकडून गांभीर्याने पालन होत नसल्याने, आता महापालिकेने थेट कारवाईचा बडगा उचलला आहे. सोशल डिस्टसिंगचे पालन व दुकानासमोरील गर्दी रोखण्यासाठी उपाययोजना न करणाऱ्या व्यावसायिकांची दुकाने ४८ तासांसाठी सील करण्याची कार्यवाही महापालिकेने सुरू केली आहे. 
    गुरूवारी महापालिका भवन परिसरातील ७ दुकाने ४८ तासांसाठी महापालिकेने सील केली आहेत. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई किती रक्कमेची असावी याची निश्चिती शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली. 


    कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्याबाबत महापालिकेने शहरातील व्यावसायिकांना, दुकानदारांना वारंवार सूचना व नियमावली जाहिर केली होती. मात्र त्याची दखल गांभीर्याने दखल न घेतल्याने, महापालिकेने प्रत्येक क्षेत्रिय स्तरावर सहाय्यक आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली अतिक्रमण निरीक्षक, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक व आरोग्य निरीक्षक अशा ३ कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले आहे.
    या पथकांना नियमांचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांची दुकाने ४८ तासांसाठी सील करण्याबाबत व दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Additional commissioners taught a good lesson to shopkeeper who not control crowd; Sealed for 48 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.