पत्तेबाज कर्मचा:यांना नोटिसा

By admin | Published: October 30, 2014 12:04 AM2014-10-30T00:04:29+5:302014-10-30T00:04:29+5:30

महापालिका भवनाच्या परिसरातच पत्त्यांचा डाव मांडून जुगार खेळणा:या अतिक्रमण विभागाच्या 42 कर्मचा:यांना आणि पोलिसांना कारणो दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

Addressing Employees: Notices to | पत्तेबाज कर्मचा:यांना नोटिसा

पत्तेबाज कर्मचा:यांना नोटिसा

Next
पुणो : शहरातील अतिक्रमण कारवाईवर डय़ुटीसाठी असतानाच महापालिका भवनाच्या परिसरातच पत्त्यांचा डाव मांडून जुगार खेळणा:या अतिक्रमण विभागाच्या 42 कर्मचा:यांना आणि पोलिसांना कारणो दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांत 2क् पोलीस आणि 24 बिगारी यांचा समावेश असून, त्या सर्वाना 48 तासांच्या आत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महापालिकेत दिवसाढवळ्या सुरू असलेला हा जुगाराचा डाव ‘लोकमत’ने ‘पालिकेत रंगतोय पत्त्यांचा डाव’ या मथळ्याखाली उजेडात आणल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या प्रकाराची चौकशीही सुरू करण्यात आली त्यात तथ्य आढळून आल्यास संबंधितांना कडक कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
शहरातील रस्त्यावर वाढलेले अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे काढण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना जादा कर्मचारी तसेच पोलिसांची कुमक मिळावी, या उद्देशाने महापालिका भवनाच्या परिसरात पोलीस व बिगारी यांच्यासह इतर अतिक्रमण विभागाच्या कर्मचा:यांच्या जादा तुकडया तैनात करण्यात आलेल्या आहेत. हे सर्व कर्मचारी कारवाईचे नियोजन नसल्यास पालिका भवनात असलेल्या अतिक्रमण विभागाच्या वाहनांत दिवसभर बसून असतात. मात्र, काही काम नसल्याने हे कर्मचारी दररोज पत्त्यांचा डाव मांडत होते. ‘लोकमत’ने हा प्रकार उघडकीस आणल्यावर त्याची गंभीर दखल घेऊन अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी या कर्मचा:यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, अतिक्रमण विभागप्रमुख जगताप यांनी या कर्मचा:यांना खुलासा सादर करण्याच्या नोटिसा बाजाविण्यात आल्याची माहिती दिली. 
 
प्रशासनाला हवा पुरावा ?
च्महापालिका भवनाच्या परिसरातच हा पत्त्यांचा डाव दररोजच रंगतो. मात्र, त्याकडे दुलक्र्ष करणा:या प्रशासनाला उशिरा का होईना, पण या कर्मचा:यांवर कारवाई करण्याचे सुचले असले, तरी प्रशासनाकडून कारवाईसाठी पुरावा गरजेचा असल्याची भूमिका घेतली जात आहे. 
च्‘लोकमत’चे हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर पत्ते खेळताना आढळलेल्या या कर्मचा:यांनी कानावर हात ठेवून ‘आम्ही पत्ते खेळत नव्हतो, तर जेवण करीत होतो,’ अशी भूमिका घेतली आहे. मात्र, दररोज जेवणाच्या वेळी आधी 1क् मिनिटे जाणारे आणि दिवसभर कोणतेही काम नसणारे हे कर्मचारी दुपारी चार वाजता जेवण करतील का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून पुराव्याचे कारण पुढे करून हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्या़ची चर्चा महापालिकेत आहे.

 

Web Title: Addressing Employees: Notices to

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.