जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:10 AM2021-03-24T04:10:34+5:302021-03-24T04:10:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. सध्या संपूर्ण जिल्ह्यात दररोज १३५ ...

Adequate supply of oxygen in the district | जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा

जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. सध्या संपूर्ण जिल्ह्यात दररोज १३५ मे.टन ऑक्सिजन लागत असून, उत्पादकांकडे ७५० मे.टन ऑक्सिजन साठा शिल्लक आहे. त्यामुळे सध्यातरी ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. परंतु, वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी उत्पादकांनी ऑक्सिजनची निर्मिती पूर्ण क्षमतेने करण्याबरोबरच पुरवठा सुरळीत ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.

जिल्ह्यातील ऑक्सिजन उत्पादक व पुरवठादारांसोबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक घेण्यात आली. बैठकीला औषध विभागाचे सहआयुक्त सुरेश पाटील, औषध निरीक्षक प्रमोद पाटील आदी उपस्थित होते. पुण्यासह राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांना आवश्यक तेवढा ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी उत्पादकांनी पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती करावी. तसेच अधिकाधिक ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी नियोजन करावे, जेणेकरुन भविष्यात देखील ऑक्सिजनचा तुटवडा पडणार नाही.

बैठकीत उत्पादक व पुरवठादारांच्या अडचणी जाणून घेऊन उपाय योजनांबाबत डॉ. देशमुख यांनी चर्चा केली. ऑक्सिजन निर्मिती कारखान्यात असलेले कर्मचारी व टँकर ड्रायव्हर यांना ‘लस’ उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन उत्पादकांनी केले असता लस उपलब्ध करून देऊ, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले. उत्पादक व पुरवठादारांना काही अडचण भासल्यास औषध विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन सह आयुक्त सुरेश पाटील यांनी यावेळी केले.

------

Web Title: Adequate supply of oxygen in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.