अवसरीतील कोविड सेंटरला आढळराव पाटलांनी दिली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:10 AM2021-05-27T04:10:41+5:302021-05-27T04:10:41+5:30
अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे असणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू असलेल्या कोविड सेंटरमध्ये सुमारे ६०० च्या आसपास रुग्ण उपचार घेत ...
अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे असणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू असलेल्या कोविड सेंटरमध्ये सुमारे ६०० च्या आसपास रुग्ण उपचार घेत आहेत. या ठिकाणी शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भेट दिली. या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या डॉक्टर, नर्सेस यांची आवर्जून चौकशी केली. यावेळी श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सॅनिटायझर व मास्क देण्यात आले.
खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यासाठी याच ठिकाणी असलेल्या मुलींच्या वसतिगृहामध्ये २८८ बेडचे ऑक्सिजन व व्हेंटिलेटर युक्त जम्बो कोविड सेंटर उभारण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. या ठिकाणी आढळराव पाटील यांनी भेट दिली व कामाची पाहणी केली.
त्यांच्या सोबत उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, तालुका प्रमुख अरुण गिरे, श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक सागर काजळे, योगेश बाणखेले उपस्थित होते.
२६ मंचर
अवसरी खुर्द येथील कोविड सेंटरला शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भेट दिली. यावेळी सॅनिटायझर व मास्क देण्यात आले.
===Photopath===
260521\26pun_7_26052021_6.jpg
===Caption===
अवसरी खुर्द येथील कोव्हिड सेंटरला शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भेट दिली. यावेळी सॅनिटायझर व मास्क देण्यात आले.