आघाव पाटील शिक्षण संस्थेला आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:14 AM2021-08-28T04:14:19+5:302021-08-28T04:14:19+5:30
एस. पी. आघाव पाटील शिक्षण संस्थेच्या अंतर्गत सध्या ज्ञानम् परं ध्येयम् हा उद्देश घेऊन सेमी माध्यमाची शिशु गट ते ...
एस. पी. आघाव पाटील शिक्षण संस्थेच्या अंतर्गत सध्या ज्ञानम् परं ध्येयम् हा उद्देश घेऊन सेमी माध्यमाची शिशु गट ते इयत्ता आठवीपर्यंत शाळा आरोग्य-संस्कार-शिक्षण या त्रिसूत्रीच्या आधारे सुरू आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत, शालेय अभ्यासक्रमाला पूरक विविध प्रकारचे कोर्सेस, क्लासेस, शिबिरे, क्रीडा, सामाजिक, आरोग्यविषयक, योगा उपक्रम शिकवले जातात. चाकण आणि चाकण पंचक्रोशीमधील आजपर्यंत शेकडो विद्यार्थी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आणि आंतरराष्ट्रीय परीक्षेमध्ये जिंकलेले आहेत.
राजस्तरीय आदर्श शिक्षण संस्था विद्यारत्न पुरस्कार २०२१ ऑनलाइन पद्धतीने सन्मानपूर्वक देण्यात आले. आधी अँड. कृष्णाजी जगदाळे यांच्या हस्ते एस. पी. आघाव पाटील शिक्षण संस्थेच्या वतीने सचिव प्रा. प्रवीण आघाव यांनी स्वीकारला. चाकण येथील ही संस्था पुरस्कार मिळणारी पहिली शिक्षण संस्था ठरली आहे.