आळंदीच्या उपनगराध्यक्षपदी आदित्य घुंडरे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:14 AM2021-09-15T04:14:49+5:302021-09-15T04:14:49+5:30

तत्पूर्वी, यापूर्वीचे उपनगराध्यक्षा पारुबाई तापकीर यांनी ठरवून दिलेल्या कालावधीत पदाचा राजीनामा दिल्याने उपनगराध्यक्षपद रिक्त झाले होते. त्यानुसार पीठासीन अधिकारी ...

Aditya Ghundre unopposed as Deputy Mayor of Alandi | आळंदीच्या उपनगराध्यक्षपदी आदित्य घुंडरे बिनविरोध

आळंदीच्या उपनगराध्यक्षपदी आदित्य घुंडरे बिनविरोध

Next

तत्पूर्वी, यापूर्वीचे उपनगराध्यक्षा पारुबाई तापकीर यांनी ठरवून दिलेल्या कालावधीत पदाचा राजीनामा दिल्याने उपनगराध्यक्षपद रिक्त झाले होते. त्यानुसार पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन विशेष बैठकीत निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.

उपनगराध्यक्ष पदासाठी आदित्यराजे घुंडरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने पीठासीन अधिकारी वैजयंता उमरगेकर यांनी घुंडरे यांची बिनविरोध निवड घोषित केली. याप्रसंगी मुख्याधिकारी अंकुश जाधव, नगरसेवक सचिन गिलबिले, सागर भोसले, सागर बोरुंदिया, सुनीता रंधवे, तुषार घुंडरे, मीरा पाचुंदे, स्मिता रायकर, प्रकाश कुऱ्हाडे, प्रशांत कुऱ्हाडे, पांडुरंग वहिले, प्रमिला रहाणे, प्राजक्ता घुंडरे, शैला तापकीर, प्रतिमा गोगावले, रुक्मिणी कांबळे आदिंसह अन्य नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष आदित्य घुंडरे यांचा नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी अंकुश जाधव, राहुल चिताळकर, अविनाश तापकीर, विलास घुंडरे, प्रमोद कुऱ्हाडे, सचिव अजित वडगावकर, कामगार नेते अरुण घुंडरे, बाबूलाल घुंडरे, अशोक उमरगेकर, सचिन पाचुंदे, बच्चन रासकर, सचिन घुंडरे, बाळासाहेब चौधरी, पांडुरंग कुऱ्हाडे, अरुण घुंडरे, सुनील रानवडे, निस्सार सय्यद आदिंसह सर्व नगरसेवकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आळंदीत निवडीनंतर जल्लोष करताना नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष आदित्य घुंडरे व मान्यवर. (छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)

Web Title: Aditya Ghundre unopposed as Deputy Mayor of Alandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.