वडगाव आनंद येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे आदित्य ठाकरेंनी केले सांत्वन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 07:14 PM2022-10-27T19:14:21+5:302022-10-27T19:16:07+5:30

वडगाव आनंद येथील दशरथ लक्ष्मण केदारी या शेतक-याने 17 सप्टेंबर रोजी कर्जबाजारी पणाला कंटाळून चिठ्ठी लिहित शेततळ्यात आत्महत्या केली होती.

Aditya Thackeray consoled the suicide victim family of Vadgaon Anand | वडगाव आनंद येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे आदित्य ठाकरेंनी केले सांत्वन

वडगाव आनंद येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे आदित्य ठाकरेंनी केले सांत्वन

googlenewsNext

आळेफाटा - वडगाव आनंद ता जुन्नर येथील कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या दशरथ केदारी यांचे कुटुंबीयांची गुरूवार (दि 27) रोजी शिवसेना युवा सेनाप्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट घेत सांत्वन केले. यावेळी आपल्या व्यथा मांडताना कुटुंबीयांचे अश्रू आनावर झाले होते. तर शिवसेना या कुटुंबीयांचे पाठिशी उभी राहणार असून त्यांचे मुलांचे शिक्षणाची जबाबदारी घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

वडगाव आनंद येथील दशरथ लक्ष्मण केदारी या शेतक-याने 17 सप्टेंबर रोजी कर्जबाजारी पणाला कंटाळून चिठ्ठी लिहित शेततळ्यात आत्महत्या केली होती. आज गुरूवारी नाशिक येथील दौ-यानंतर दुपारी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी जुन्नर तालुक्यात येत वडगाव आनंद रेथील आत्महत्या केलेल्या या शेतक-याच्यी कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी यावेळेस विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गो-हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन आहेर 

माजी आमदार बाळासाहेब दांगट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी संपर्कप्रमुख संभाजी तांबे तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे उपसभापती दिलीप डुंबरे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसन्न डोके नारायणगाव सरपंच बाबु पाटे पंचायत समितीचे सदस्य जीवन शिंदे, गणेश कवडे, गणेश वाघमारे, कैलास वाळुंज, सचिन वाळुंज उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी कुटुंबीयांची आस्थेने चौकशी केली. तसेच त्यांच्या पत्नी शांता यांनी यावेळी भाऊबीज ओवाळणी केली तर आदित्य ठाकरे यांनीही साडी देत आर्थिक मदत केली.

यावेळेस पत्रकारांनी संवाद साधताना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले की वडगाव आनंद येथील घटना ही दुर्दैवी असून एक भाऊ म्हणून मी या कुटुंबीयांचे पाठिशी उभा राहणार आहे. गेल्या दोन तीन महिन्यांपासून  अशा घटना घडत आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांशी परिस्थिती अतिशय बिकट असून आतापर्यंत बांधावर कोणीही गेलेले नाही. कृषी मंत्री कोण व कुठे आहेत ते दिसणे गरजचे असल्याची टिका केली. नुकसानीचे संपुर्ण पंचनामे करून कोणतेही राजकारण न करता शेतक-यांना तातडीने नुकसान भरपाई मिळण्याची व महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.  उपसभापती गो-हे म्हणाले की कांद्याचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून शेतक-यांना भेडसावत आहे. अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असुन शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी यापुढेही राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दौरा करणार आहे. तसेच केदारी कुटुंबीला घरकुल तसेचवअधिकची आर्थिक मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनीत्यांनी यावेळेस दिले.
 

Web Title: Aditya Thackeray consoled the suicide victim family of Vadgaon Anand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.