मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज

By admin | Published: February 21, 2017 01:48 AM2017-02-21T01:48:21+5:302017-02-21T01:48:21+5:30

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०१७ साठी उद्या मंगळवारी (दि. २१) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०

Admin ready for polling process | मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज

मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज

Next

 बारामती : जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०१७ साठी उद्या मंगळवारी (दि. २१) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेचे ६ गट व पंचायत समितीच्या १२ गणांसाठी २७७ मतदान केंद्रांवर २
लाख ४७ हजार ८७९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान
प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शंकरराव जाधव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत पाटील यांनी दिली.
२७७ मतदान केंद्रांची स्थापना...
मतदानासाठी तालुक्यात एकूण २७७ मतदान केंद्रे स्थापित करण्यात आली आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी तसेच मतदारांच्या सोयीच्या दृष्टीनेही मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक २०१४, विधानसभा निवडणूक २०१४ तसेच नुकतीच झालेली नगर परिषद निवडणूक, या कालावधीत मतदान प्रक्रियेदरम्यान बारामती तालुक्यातील एकाही मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार अथवा गुन्ह्यांची नोंद झालेली नव्हती. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्रमांक १ ते ५, शिपाई, पोलीस कॉन्स्टेबल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांसह ४० क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशाप्रकारे २३१५ कर्मचाऱ्यांची तालुक्यात नियुक्ती करण्यात आली आहे. अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना झाले आहेत.
भारतीय लोकशाही ही जगातील सर्वांत मोठी लोकशाही आहे. या लोकशाही प्रक्रियेला बळकट करण्यासाठी सर्व मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे. मतदारांनी कोणत्याही आमिषाला व दबावाला बळी पडू नये. मतदान हे पवित्र कर्तव्य आहे. तरी सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Admin ready for polling process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.