प्रशासन व पदाधिकाऱ्यांत ‘डेडलाईन’चा वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 03:40 AM2018-12-12T03:40:15+5:302018-12-12T03:40:29+5:30

आयुक्तांचा प्रस्ताव पुढे ढकलला; प्रशासनाचे वर्गीकरणही अडविले

The administration and the office bearers 'deadline' | प्रशासन व पदाधिकाऱ्यांत ‘डेडलाईन’चा वाद

प्रशासन व पदाधिकाऱ्यांत ‘डेडलाईन’चा वाद

Next

पुणे : महापालिकेच्या अंदाजपत्रकातील तरतुदीच्या वर्गीकरणासाठी नगरसेवकांकडून देण्यात येणाºया प्रस्तावांवर येत्या १५ डिसेंबरनंतर प्रशासकीय अंमलबजावणी करणे शक्य होणार नाही, हा आयुक्त सौरभ राव यांनी ठेवलेला प्रस्ताव मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पुढे ढकलला. प्रशासनाने वर्गीकरणासाठी दिलेल्या ‘डेडलाईन’वरून स्थायी समितीच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली.

सदस्यांना डेडलाईन देण्यापूर्वी प्रशासनाने आपली कामेदेखील वेळेत पूर्ण करावीत, अशा तीव्र भावना सदस्यांनी व्यक्त केल्या. प्रशासन सदस्यांच्या वर्गीकरणाच्या प्रस्तावांची अंमलबजावणी करणार नसले, तर त्याचे वर्गीकरण तरी का मंजूर करायचे? असा पवित्रा स्थायी समितीने घेतला.  यामुळे महापालिकेच्या नवीन इमारतीसाठी कमी पडणारा साडेबारा कोटींच्या निधीच्या वर्गीकरणाचा प्रस्ताव अडविण्यात आला आहे.

पुणे महापालिकेच्या मंजूर बजेटमधील अन्य कामांसाठी निधीचे वर्गीकरण केले जाते. त्यासाठी नगरसेवक वर्गीकरणाचे प्रस्ताव स्थायी समितीमार्फत सर्वसाधारण सभेला देतात. सर्वसाधारण सभेची मान्यता झाल्यानंतर या ठरावाची कार्यवाही करण्यासाठी ते प्रशासनाकडे येतात. त्यावर आयुक्तांची पूर्वमान्यता घेऊन त्यानंतर पूर्वगणनपत्रक मान्यता केली जाते. निविदा प्रक्रिया व प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, यासाठी वेळ लागतो. त्यामुळे २०१७-१८ या आर्थिक वर्षातील शेवटच्या तीन महिन्यांत नगरसेवकांनी सुचविलेले वर्गीकरणाचे प्रस्ताव मंजूर होऊनही प्रशासनाला प्राप्त झाले होते.

आयुक्तांना त्या ठरावाच्या कार्यवाहीच्या अंमलबजावणीसाठी कार्यवाही केली होती; पण प्रत्यक्ष काम करण्यासाठी मिळालेला अपुरा कालावधी यामुळे अनेक प्रस्तावांची अंमलबजावणी होऊ शकली नाही, तर काही विभागांनी कामे पूर्ण करून घेतली. मात्र, निधी देताना आर्थिक वर्ष संपल्यामुळे वर्गीकरणाने उपलब्ध झालेल्या तरतुदीमधून निधीतून ही बिले अदा होऊ शकली नाहीत. त्यामुळे २०१८-१९च्या अंदाजपत्रकीय तरतुदीमधून हा निधी द्यावा लागला. ही बाब आर्थिक शिस्तीला धरून नाही. त्यामुळे महापालिकेच्या सर्व विभागांना प्राप्त होणारे १५ डिसेंबरनंतर प्राप्त होणाºया वर्गीकरणाच्या प्रस्तावाचा मंजुरीसाठी विचार होणार नाही, असा प्रस्ताव आयुक्त सौरभ राव यांनी ठेवला होता. त्यावर स्थायीच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली; परंतु आयुक्त ३ दिवस रजेवर आहेत. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी याबाबतची माहिती दिली. मात्र, आयुक्त नसल्यामुळे हा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला.

प्रशासनामुळेच दिरंगाई
अंदाजपत्रक मंजूर झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने दर वर्षी ठरविण्यात येणार डीएसआर (कामांचे दर) निश्चित करणे आवश्यक आहे. परंतु, त्यासाठी दोन-दोन महिन्यांचा कालावधी घेतला जातो. त्यानंतर विविध कामांचे पूर्वगणनपत्रक तयार करण्यासाठी बराच वेळ घेतला जातो. निविदा काढणे, त्याची वर्कआॅर्डर देणे ही कामे प्रशासनाकडून वेळेत होत नाहीत. यामुळे अंदाजपत्रकातील कामांसाठी खरे तर प्रशासनाकडूनच दिरंगाई होते. केवळ नगरसेवकांकडून वर्गीकरणाच्या प्रस्तावांना उशीर होतो म्हणून ते मंजूर न करणे हे चुकीचे आहे. प्रशासनाने आपल्या स्तरावर होणाºया दिरंगाईचा गांभीर्याने विचार करावा.
- योगेश मुळीक, स्थायी समिती अध्यक्ष

Web Title: The administration and the office bearers 'deadline'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.