कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:09 AM2021-05-27T04:09:33+5:302021-05-27T04:09:33+5:30

भोर: कोरोनाच्या दोन लाटेत प्रशासनाने योग्य नियोजन करून दोन्ही लाटा थोपवल्या. आता तिसरी लाट सप्टेंबर आॅक्टोबर महिन्यात येण्याची ...

The administration must be prepared to face the third wave of corona | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे

Next

भोर: कोरोनाच्या दोन लाटेत प्रशासनाने योग्य नियोजन करून दोन्ही लाटा थोपवल्या. आता तिसरी लाट सप्टेंबर आॅक्टोबर महिन्यात येण्याची शक्यता आहे. यात लहान मुलांना धोका अधिक आहे. त्यामुळे भोर, वेल्हे व मुळशी तालुक्यांतील प्रशासनाने योग्य नियोजन करून तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे, असे प्रतिपादन आमदार संग्राम थोपटे यांनी केले.

भोर पंचायत समितीच्या सभागृहात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यावर आढावा व तिसऱ्या लाटेबाबत नियोजन याची बैठक आयोजित केली होती. त्या वेळी आमदार थोपटे बोलत होते. या वेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील, तहसीलदार अजित पाटील, शिवाजी शिंदे, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, विशाल शिंदे, डाॅ. सूर्यकांत कऱ्हाळे, डाॅ. अंबादास देवकर, डाॅ. दत्ताञय बामाणे, मुख्यधिकारी डाॅ. विजय थोरात, जि. प. सदस्य विठ्ठल आवाळे, रोहन बाठे, पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, डाॅ. अमित शेठ व अधिकारी उपस्थित होते.

प्रस्ताविकात उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी कोरोनाबाबत महिती देऊन तिसऱ्या लाटेबाबत करण्यात येणाऱ्या नियोजनाची माहिती दिली.

यावेळी भोर, वेल्हे व मुळशी तालुक्यांतील तालुका आरोग्य आधिकारी यांनी कोरोना प्रादुर्भावाबाबत माहिती देऊन तिन्ही तालुक्यांतील तिसऱ्या लाटेच्या नियोजनाची माहिती दिली.

तिसरी लाटेचा प्रादुर्भाव लहान मुलांवर होणार असून, डोळे दुखणे, नाक बंद होणे, चेहरा बधिर होणे, दोन दोन दिसणे, डोळे सुजणे, लाल होणे,उलटी येणे,रक्तश्राव होणे ही लक्षणे आहेत. विशेषता लहान मुलांनी व त्यांच्या पालकांनी सावधानता बाळगणे महत्त्वाचे आहे.

भोर तालुक्यात म्युकरमायकेसेसचे सर्वेक्षण सुरु असून ४३२ जणांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी एक बाधित आहे तर वेल्हे तालुक्यात एकही रुग्ण नाही.

या वेळी आमदार संग्राम थोपटे यांनी तीनही तालुक्यांतील कोविड सेंटर, कोविड हेल्थ केअर सेंटरमधील रुग्ण व खाजगी दवाखान्यातील रुग्णसंख्या रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा,त्यांना कोणत्या अडचणी आहेत,कोणती सेंटर सुरु झाली नाहीत,आॅक्सीजनचा पुरेसा पुरवठा आहे का याची माहिती घेऊन डाॅक्टर अधिकारी यांना उपाययोजना सुचवल्या आणी कोरोनाच्या पहिल्या दोन लाटेचा जसा सामना केला त्याच पध्दतीने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी प्रशासनाने सज्ज राहण्याचे आवाहन केले.

कोरोना आढावा बैठकीत बोलताना आमदार संग्राम थोपटे व इतर फोटो.

Web Title: The administration must be prepared to face the third wave of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.