कोरोना लसीकरणासाठी खेडमध्ये प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:14 AM2021-01-16T04:14:04+5:302021-01-16T04:14:04+5:30

कोरोना व्हॅक्सिन ठेवण्यासाठी आवश्यक यत्रंणा आणि लस घेतल्यानंतर अर्धा तास संबंधित व्यक्तीला आरोग्य निरक्षणाखाली ठेवण्यासाठी वेंटिग रुम सज्ज करण्यात ...

Administration ready in Khed for corona vaccination | कोरोना लसीकरणासाठी खेडमध्ये प्रशासन सज्ज

कोरोना लसीकरणासाठी खेडमध्ये प्रशासन सज्ज

Next

कोरोना व्हॅक्सिन ठेवण्यासाठी आवश्यक यत्रंणा आणि लस घेतल्यानंतर अर्धा तास संबंधित व्यक्तीला आरोग्य निरक्षणाखाली ठेवण्यासाठी वेंटिग रुम सज्ज करण्यात आली आहे. चांडोली ग्रामीण रुग्णालयात आणि कडुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात अंगणवाडी सेविका मदतनीस, पर्यवेक्षिका आणि अधिकारी मिळुन ८५० तर शासकीय आरोग्य कर्मचारी ५६९ तर ग्रामीण भागातील खाजगी डाँक्टरासह, स्टाफ ४९७ असे एकुण १९१६ जणांची नाव नोंदणी करुन दररोज शंभर व्यक्तींना लस टोचणी करण्याचे नियोजन केले आहे. राजगुरुनगर नगरपरीषद हद्दीत चांडोली ग्रामीण रुग्णालयाचे ६२ आणि खाजगी डाँक्टर आणि स्टाफ २००,चाकण नगरपरीषद हद्दीत २६४ डाँक्टर आणि स्टाफ तसेच ३४ ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी, आळंदी नगरपरीषद हद्दीत ग्रामीण रुग्णालयाचे ३५ आणि १२८ खाजगी डाँक्टर आणि स्टाफ असे एकुण १३१ ग्रामीण रुग्णालय स्टाफ आणि ५९२ खाजगी डाँक्टरासह स्टाफ कर्मचाऱ्यांनी नोंद केली आहे. शनिवार दि.१६ जानेवारी पासुन करोना व्हँक्सिन लसीचे डोस देण्यास सुरुवात केली जाणार आहे. आँनलाईन नोंदणी केलेल्या कर्मचारी आणि खाजगी वैद्यकीय स्टाफ यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल वरुन मँसेज देण्यात आल्यानंतरच आपणास देण्यात आलेल्या चांडोली अथवा कडुस या दोन्हीपैकी जे केंद्र देण्यात आले त्याच केंद्रात जाऊन दिलेल्या वेळेत उपस्थित राहुन लसीकरण करण्याचे आवाहन डॉ. बळीराम गाढवे यांनी केले आहे.

Web Title: Administration ready in Khed for corona vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.