कचराकोंडी रोखण्यासाठी प्रशासन सज्ज

By Admin | Published: December 31, 2014 11:27 PM2014-12-31T23:27:28+5:302014-12-31T23:27:28+5:30

कचरा टाकण्यासाठी राज्यशासनाकडून महापालिकेला तातडीने जागा उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले.

Administration ready to stop garbage | कचराकोंडी रोखण्यासाठी प्रशासन सज्ज

कचराकोंडी रोखण्यासाठी प्रशासन सज्ज

googlenewsNext

पुणे : शहरातील कचरा ऊरूळी (देवाची) व फुरसुंगी येथे टाकण्यास ग्रामस्थांकडून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभुमीवर कचरा टाकण्यासाठी राज्यशासनाकडून महापालिकेला तातडीने जागा उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर गुरूवारपासून होणाऱ्या आंदोलनास तोंड देण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्याची कुमार यांनी दिली.
ऊरूळी देवाची) व फुरसुंगी येथे ३१ डिसेंबरनंतर कचरा टाकू देणार नाही असे तिथल्या ग्रामस्थांनी आॅगस्ट २०१४ मध्ये मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये स्पष्ट केले होते. त्यानुसार १ जानेवारीपासून कचऱ्याच्या गाडया अडविण्याचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. १ जानेवारीपासून ग्रामस्थांकडून अटकाव केला जाणार असल्याच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची कुणाल कुमार व महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी माहिती दिली.
कचरा प्रश्नावर दिर्घकालीन उत्तर शोधण्यासाठी महापालिकेला किमान एक ते सव्वा वर्ष लागणार आहे. शहरामध्ये दररोज १६०० ते १८०० टन कचरा निर्माण होतो. त्यातील किमान हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया करून तो जिरविण्याचे लक्ष्य पालिकेने निश्चित केले आहे. मात्र तरीही दररोज ६०० ते ८०० टन कचऱ्याचा प्रश्न कायम
राहणार आहे.
त्यासाठी तातडीने जागा उपलब्ध होण्याशिवाय कोणताही दुसरा पर्याय उपलब्ध नाही.
दत्तात्रय धनकवडे यांनी सांगितले की, ‘‘मोशी, पिंपरी सांडस येथील वनविभागाची जागा कचरा जिरविण्यासाठी मिळावी याकरिता राज्यशासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेले आहेत मात्र अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. रोखेम येथे सध्या २५० टन कचऱ्यावर प्रक्रिया होते, येत्या दोन महिन्यात
त्याची क्षमता ४०० टन इतकी
वाढणार आहे. कचरा आपल्याच प्रभागात जिरविण्यासाठी कठोर भुमिका घ्यावी लागणार आहे. ’’ (प्रतिनिधी)

४उरूळी (देवाची) व फुरसुंगी येथे कचरा टाकणे बंद झाल्यास शहरात गोळा होणाऱ्या कचऱ्याचे महापालिका फक्त पुढील १५ दिवस नियोजन करू शकेल. कचरा प्रक्रियेसाठी मंजूर केलेले प्रकल्प उभारणीस एक ते सव्वा वर्षाचा अवधी लागणार आहे. तोपर्यंत उरूळी देवाची येथे कचरा डेपो कॅपिंग करण्यास परवानगी मिळावी किंवा तातडीने पर्यायी जागा उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

ओला व सुका कचरा वेगळाच हवा
४नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करून टाकणे अत्यंत आवश्यक आहे. त्याकरिता घंटागाडी व स्वच्छ कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. त्याचबरोबर कचऱ्याच्या कंटेनरजवळ दोन पाळयांमध्ये कर्मचारी नेमले जाणार आहेत. बायोगॅस प्रकल्पांसाठी ओला कचऱ्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ओला कचरा मार्गी लागल्या शहरच्या निम्म्या कचऱ्याची समस्या सुटू शकेल असे दत्तात्रय धनकवडे यांनी स्पष्ट केले.

शहरासाठी कचरा हे मोठे आव्हान आहे. गेल्या २० वर्षात कचरा तिप्पटीने वाढला आहे. गेल्या ४ महिन्यात कचऱ्यासाठी अनेक पर्यायी जागा मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीत कचरा रस्त्यावर राहू दिला जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कचरा जिरविण्याच्या प्रकल्पांची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.’’ - कुणाल कुमार, आयुक्त

जवळच्या शेतांमध्ये कचरा जिरविणार
४शहरालगतच्या शेतांमध्ये कचरा टाकण्यास १० शेतकऱ्यांनी मान्यता दिली आहे. त्यांच्या शेतांमध्ये महापालिकेकडून मोठे खडड्े घेण्यात आले आहेत. त्याठिकाणी ओला कचरा टाकून ते खडड्े बुजविण्यात येणार आहेत. पुढच्या ३ महिन्यांमध्ये कचरा प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले जाणार असल्याचे कुणाल कुमार यांनी सांगितले.

Web Title: Administration ready to stop garbage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.