प्रशासनाने आमचंही दुःख पाहावं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:10 AM2021-04-03T04:10:24+5:302021-04-03T04:10:24+5:30
मोती बिल्डिंगमध्ये एकूण ६० घरे व ८ दुकाने असून, फॅशन मार्केट लागलेल्या आगीत येथील सहा घरे व ...
मोती बिल्डिंगमध्ये एकूण ६० घरे व ८ दुकाने असून, फॅशन मार्केट लागलेल्या आगीत येथील सहा घरे व खालील पाच,सहा दुकानांचे नुकसान झाले. यात एयर कंडिशन, ड्रेनेजलाइन, फ्रीज, पाण्याचा पाइप , पाण्याची हजार लिटर क्षमतेची टाकी, सौन्दर्यप्रसाधनाचे समान, पाण्याची मोटार, घराच्या खिडक्या,संपूर्ण विद्युत पुरवठा करणाऱ्या वायरिंग आणि घरातील इतर महत्वाच्या जीवांवश्यक वस्तू फॅशन स्ट्रीटला लागलेल्या आगीत नष्ट झाल्या.
याविषयी माहिती देताना येथील नागरिकांचा प्रशासन व फॅशन मार्केटमधील व्यापाऱ्यांविषयीची चीड स्पष्ट जाणवत होते.
आज फॅशन स्ट्रीट अनधिकृत आहे. कॅन्टोन्मेंटने त्यावर कार्यवाही का नाही केली, त्यांच्या या नाकर्तेपणामुळे आमच्यातील कोणाचा बळी गेला असता तर?
-बसू रॉय
- बिल्डिंगला आग लागली असता आम्ही सर्वांनी महत्त्वाची कागदपत्रे, गॅस सिलेंडर खाली घेऊन गेलो. फायर ब्रिगेड गाडी अतिशय उशिरा आमच्या बिल्डिंगमध्ये आली. आम्ही सर्व टेरेसवर घरातून बकेट भरभरून पाणी आगीवर मारत होतो.
-कुणाल गणदेवीया
आगीने आमची पूर्ण वायरिंग जाळून खाक झाली असून घरातील विद्युत उपकरणे जळली असून जीव मात्र वाचला आहे.
-हेमा बिल्लीमोरीया
मनोज गुप्ता- घरातील पाण्याची मोटार, एअर कंडिशन, किचनमधील साहित्य सर्व नष्ट झाले असून पत्नीचे ब्युटी पार्लरचे जवळपास लाख रुपयांचे सामान जळून खाक झाले आहे.
खरं तर प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे हे घडलं आहे. काल अनधिकृत स्टॉलमुळे फायर ब्रिगेडला फॅशन स्ट्रीटमध्ये जाता आले नाही. त्यामुळे एवढी मोठी आग लागली. - हितेंद्र शाह, व्यावसायिक