प्रशासनाने बस वाहतूक रोखली
By admin | Published: July 29, 2014 10:54 PM2014-07-29T22:54:17+5:302014-07-29T22:54:17+5:30
पोलिसांच्या आवाहनावरून बारामती आगारातून सोडण्यात येणा:या बसेस एका तासासाठी थांबवण्यात आल्या होत्या.
Next
बारामती : धनगर समाज आरक्षणावरून तालुका आणि परिसरात कार्यकत्र्यानी रास्ता रोकोच्या वेळी एसटी बसेसना लक्ष करू नये, म्हणून पोलिसांच्या आवाहनावरून बारामती आगारातून सोडण्यात येणा:या बसेस एका तासासाठी थांबवण्यात आल्या होत्या. त्यामुळे विविध कामांसाठी बारामती येथे आलेल्या प्रवाशांना बसस्थानकामध्ये ताटकळत उभे राहावे लागले. अचानक घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे प्रवासीवर्गातून संताप व्यक्त होत होता.
बारामती येथे सुरू असलेल्या धनगर समाजाच्या आरक्षण आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. बारामती आणि इंदापूर तालुक्यातदेखील रास्ता रोकोच्या माध्यमातून धनगर समाजातील कार्यकत्र्यानी आघाडी शासनाच्या विरोधात आपला रोष व्यक्त केला आहे, तर काही ठिकाणी आंदोलक हिंसक झाले आहेत. आंदोलना दरम्यान बारामती येथे झालेली गर्दी लक्षात घेता जमाव प्रक्षोभक होऊ नये, म्हणून पोलीस प्रशासन आणि बारामती आगाराकडून खबरदारी घेण्यात आली होती. (प्रतिनिधी)
4मंगळवार (दि. 29) रोजीदेखील बारामती आणि इंदापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये बंद पाळण्यात आला. त्याचबरोबर आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड आणि पद्माकर वळवी यांच्या पुतळ्याचे ठिकठिकाणी प्रतीकात्मक दहन करण्यात आले. या वेळी आंदोलक अधिक आक्रमक होऊन एसटी बसेसना लक्ष्य करू नयेत.
बसेसचे नुकसान होऊ नये. म्हणून बारामती शहर पोलिसांच्या आवाहनावरून एका तासासाठी दुपारी तीनच्या दरम्यान आगारातून सोडण्यात येणा:या बसेस थांबवण्यात आल्या. मात्र, लांब पल्ल्याच्या बसेस बाहेरील परिस्थितीचा अंदाज घेऊन सोडण्यात येत होत्या.
- रमाकांत गायकवाड,
बारामती आगारप्रमुख