प्रशासकीय अधिकाऱ्याने स्वीकारली ५० हजारांची लाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:10 AM2021-07-17T04:10:44+5:302021-07-17T04:10:44+5:30
पुणे : बाणेर येथील आर्किड इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) लॉटरी पद्धतीने मिळणाऱ्या प्रवेश यादीमध्ये तक्रारदाराच्या मुलीचे नाव ...
पुणे : बाणेर येथील आर्किड इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) लॉटरी पद्धतीने मिळणाऱ्या प्रवेश यादीमध्ये तक्रारदाराच्या मुलीचे नाव समाविष्ट करण्यात आले होते. त्याबाबत कागदपत्रे तपासून प्रवेशास मान्यता देण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या सहायक प्रशासकीय अधिकाऱ्याने तक्रारदराकडून ५० हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.
शिवाजी बबन बोखारे (वय ५०, सहायक प्रशासकीय अधिकारी, शिक्षण विभाग महापालिका) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत ३७ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. बोखारे यांनी कागदपत्रे तपासून शाळेत प्रवेशास मान्यता देण्याकरिता तक्रारदाराकडे ६० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ५० हजार रुपये देण्याचे ठरले. बोखारे यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. त्यांच्यावर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वर्षाराणी पाटील पुढील तपास करीत आहेत.
----------------------------------