पुणे जिल्हा परिषदेवर २१ मार्चपासून प्रशासक?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 08:45 AM2022-03-11T08:45:25+5:302022-03-11T08:48:27+5:30

जिल्हा परिषदेची आणि तेरा पंचायत समित्यांची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता...

administrator on pune zilla parishad from march 21 zp election postponed | पुणे जिल्हा परिषदेवर २१ मार्चपासून प्रशासक?

पुणे जिल्हा परिषदेवर २१ मार्चपासून प्रशासक?

googlenewsNext

पुणे :जिल्हा परिषदेच्या (pune zp) विद्यमान सदस्य आणि पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल येत्या २१ मार्च रोजी संपत आहे. अद्याप गट आणि गणांची प्रारूप रचना अंतिम न झाल्याने तसेच निवडणूक कार्यक्रम जाहीर न झाल्यामुळे जिल्हा परिषदेवर २१ मार्चपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर प्रशासक नेमले जाण्याची शक्यता आहे.

पुण्यासह राज्यातील २६ जिल्हा परिषदांचा कार्यकाल संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहे. जिल्हा परिषदेच्या गट आणि गणांची प्रारूप रचना अद्याप तयार झालेली नाही. त्यात नुकताच स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे, तारखा ठरवणे, प्रारूप रचना ठरवणे याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाला राज्य शासनाला विचारून घ्यावा लागणार आहे. यामुळे गट व आणि जिल्ह्यातील तेरा पंचायत गणांच्या पुनर्रचनेवर परिणाम होणार आहे. या बाबींमुळे यंदा निवडणुका पडणार असल्याचे स्पष्ट संकेत असून, स्पष्ट झाले आहे. 

जिल्हा परिषदेची आणि जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांची निवडणूक लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट संकेत असून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर प्रशासक येण्याची शक्यता आहे. 

  • जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकारी व सदस्यांची मुदत २१ मार्चला संपणार आहे. तर तेरा पंचायत समित्यांचा कार्यकाल १३ मार्चला संपत आहे.
  • अद्याप गट, गण रचना व त्यांची आरक्षण सोडत ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. यामुळे २१ तारखेपासून जिल्हा परिषदेवर तर १४ मार्चपासून पंचायत समित्यांवर प्रशासन नेमला जाण्याची शक्यता आहे.

 

निवडणुका लांबणीवर...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबतचे अधिकार आता राज्य शासनाकडे आहेत. या नव्या आदेशामुळे महानगरपालिकेची प्रभाग रचना पुन्हा होण्याची शक्यता आहे. यासोबतच जिल्हा परिषदेच्या गट आणि गणांची प्रारुप रचनाही बदलण्याची शक्यता आहे. यासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता असल्याने निवडणुका लांबणीवर जाणार आहेत. यामुळे प्रशासकाच्या कालावधीतही वाढ होण्याची शक्यता आहे. किमान ३ ते ४ महिने प्रशासक राहण्याची शक्यता आहे.

Web Title: administrator on pune zilla parishad from march 21 zp election postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.