ग्रामपंचायत निवडणूकांसाठी प्रशासज सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:08 AM2020-12-23T04:08:45+5:302020-12-23T04:08:45+5:30

ऐन निवडणुकीच्या तोंडात तहसीलदार सुचित्रा आमले यांची तडकाफडकी बदली झाल्याने मंगळवार दि.२२ डिसेंबर पर्यत नव्याने येणाऱ्या तहसीलदारांनी पदभार स्विकरला ...

Administrators ready for Gram Panchayat elections | ग्रामपंचायत निवडणूकांसाठी प्रशासज सज्ज

ग्रामपंचायत निवडणूकांसाठी प्रशासज सज्ज

googlenewsNext

ऐन निवडणुकीच्या तोंडात तहसीलदार सुचित्रा आमले यांची तडकाफडकी बदली झाल्याने मंगळवार दि.२२ डिसेंबर पर्यत नव्याने येणाऱ्या तहसीलदारांनी पदभार स्विकरला नसला तरी निवडणुक प्रक्रीयेची प्रशासनाने तयार पुर्ण केली आहे. बुधवारपासून (दि २३) ग्रामपंचायतनिहाय उमेदवार अर्ज स्विकारण्याची व्यवस्था तालुका क्रीडा संकुलावर करण्यात आली आहे. अर्ज छाननी, माघार, चिन्ह वाटप, मतदान साहित्याचे वाटप, कर्मचारी प्रशिक्षण, आणि मतमोजणी प्रक्रीया क्रीडासंकुलात पार पाडली जाणार आहे.

२३ ते ३० डिसेंबर या काळात नामनिर्देशन पत्र स्विकारण्याची दिलेल्या मुदती तीन सुट्या आल्यामुळे अवघे पाच दिवस उमेदवारांना मिळणार आहेत. त्यातच आँनलाईन उमेदवारी अर्ज भरताना सर्व्हर डाऊन होण्याचे प्रमाण जास्त असल्याने उमेदवार आणि समर्थकांची चागंलीच धाकधुक वाढणार आहे. राजगुरुनगर येथे नामनिर्देशन अर्ज भरताना गर्दी होणार असल्याने पोलिसांना मोठा बंदोबस्त ठेऊन कोरोना काळात होणाऱ्या गर्दीला अटकाव करण्यासाठी खबरदारी घ्यावी लागणार आहे.

चौकट

३१ डिसेंबर ला नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे. सोमवार दि.४ जानेवारीला दुपारी तीन वाजेपर्यत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. माघारीनंतर उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांना अवघ्या दहा दिवसात प्रचाराची रणनिती आखुन पँनलचे जास्तीत जास्त संख्याबळ निवडुन आणण्यासाठी पँनलप्रमुखांना चागंली कसरत करावी लागणार आहे.

Web Title: Administrators ready for Gram Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.