पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात १०० विद्यार्थ्यांना प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:11 AM2021-03-20T04:11:24+5:302021-03-20T04:11:24+5:30
पुणे : महापालिकेच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या ''भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालया''मध्ये दरवर्षी १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती ...
पुणे : महापालिकेच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या ''भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालया''मध्ये दरवर्षी १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
हे वैद्यकीय महाविद्यालय डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयामध्ये उभारण्यात येणार असून, हे वैद्यकीय महाविद्यालय चालविण्यासाठी पुणे महानगरपालिका - मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट (पीएमसी-एमईटि) स्थापन करण्यात आला आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या दैनंदिन व प्रशासकीय कामकाजाकरीता स्वत:चे बोधचिन्ह असणे आवश्यक आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय, पीएमसी-एमईटी या करीता बोधचिन्हांचे दोन नमुने विद्यार्थी-विद्यार्थीनी, इच्छुक व्यक्ती, संस्था यांचेकडून मागविण्यात आले आहेत. यातून उत्कृष्ट बोधचिन्हांची निवड होणार असून हे बोध चिन्ह महाविद्यालयाच्या व ट्रस्टच्या कामकाजाकरीता कायमस्वरुपी वापरात येणार आहे.
या बोधचिन्हामध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे छायाचित्र व ट्रस्टच्या बोधचिन्हामध्ये (PMC-MET) च्या नावाचा समावेश असणे आवश्यक आहे. निवड करण्यात आलेल्या बोधचिन्हासाठी पाच हजारांचे प्रथम पारितोषिक, दोन हजारांचे व्दितीय पारितोषिक देण्यात येणार आहे.
इच्छुक विद्यार्थी-विद्यार्थीनी, व्यक्ती, संस्था यांना या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन महापौर मोहोळ यांनी केले आहे.