इयत्ता अकरावीला प्रवेश घ्यायचाय...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 07:00 AM2019-05-26T07:00:00+5:302019-05-26T07:00:03+5:30

इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

Admission to Class of 11th ... | इयत्ता अकरावीला प्रवेश घ्यायचाय...

इयत्ता अकरावीला प्रवेश घ्यायचाय...

Next
ठळक मुद्दे पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये एकुण ९ झोन

राखीव कोट्याअंतर्गत प्रवेश : इनहाऊस कोटा : १० टक्के
व्यवस्थापन कोटा : ५ टक्के 
अल्पसंख्यांक कोटा (केवळ अल्पसंख्यांक संस्थांसाठी) : ५० टक्के
-------------
पुणे : इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. प्रवेश प्रक्रियेतील अर्जाचा भाग १ (वैयक्तिक माहिती) व भाग २ (पसंतीक्रम) या दोन टप्प्यांमध्ये संकेतस्थळावर भरायचा आहे. भाग १ भरण्याची प्रक्रिया सोमवार (दि. २७) पासून सुरू होत आहे. तर इयत्ता दहावीच्या ऑनलाईन निकालानंतर भाग २ भरता येईल. प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक निकालानंतरच जाहीर केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना त्यांची शाळा किंवा मार्गदर्शन केंद्रावर माहिती पुस्तिका मिळेल. तर अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्रावरून माहिती पुस्तिका घ्यावी लागेल. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये एकुण ९ झोन करण्यात आले असून त्यामध्ये राज्य मंडळाचे विद्यार्थी, अन्य मंडळाचे विद्यार्थी व व्यावसायिक शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र मार्गदर्शन केंद्र करण्यात आली आहेत.
-------------
असा भरा ऑनलाईन अर्ज : 
- शाळा किंवा मार्गदर्शन केंद्रावरून प्रवेश प्रक्रियेची माहितीपुस्तिका मिळेल.
- अर्ज शक्यतो आपली शाळा किंवा मार्गदर्शन केंद्रातून भरा.
- माहितीपुस्तिकेसोबत लॉगीन आयडी व पासवर्ड दिला जाईल. त्याचा संकेतस्थळावर प्रथम लॉगीन करण्यासाठी वापर करा. यावेळी पासवर्ड बदलाही येईल. 
- अर्जाचा भाग १ भरताना संगणकावर दिलेल्या सुचना नीट पहा.
- महाराष्ट्र राज्य मंडळाची दहावीच्या परीक्षेला नियमित बसलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचा बैठक क्रमांक टाकल्यावर त्यांची वैयक्तिक माहिती आपोआप येईल. त्यात  काही चुका असल्यास शाळा किंवा मार्गदर्शन केंद्रातून दुरूस्त करून घ्यावी.
- ज्या विद्यार्थ्यांची माहिती येणार नाही, त्यांनी तसेच अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनी सर्व माहिती स्वत: भरावयची आहे.
- भाग १ संपुर्ण भरून झाल्यानंतर अर्जातील माहिती (स्वत:चे नाव, आईचे नाव, जन्म तारीख, प्रवर्ग, आरक्षण, मोबाईल क्रमांक इ.) अचूक असल्याचे शाळा किंवा मार्गदर्शन केंद्रातून प्रमाणित (अपु्रव) करावी.
- अर्ज प्रमाणित करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे दाखवा.
- प्रमाणित केलेल्या अर्जाची प्रिंट घ्या व ती जपून ठेवा.
- जे विद्यार्थी अर्ज प्रमाणित करणार नाहीत त्यांचा अर्ज अपुर्ण (पेंडिंग) राहील. अशा विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज प्रवेश प्रक्रियेसाठी विचारात घेतले जाणार नाहीत. त्यांना भाग २ भरता येणार नाही. त्यासाठी अर्ज भरून झाल्यावर संकेतस्थळावर ‘माय स्टेटस’ तपासावे.
- अर्ज सादर (सबमिट) केल्यानंतर काही बदल करायचा असल्यास शाळा किंवा मार्गदर्शन केंद्राकडून दुरूस्ती करता येईल. 
--------------
---------------
राखीव कोट्याअंतर्गत प्रवेश : इनहाऊस कोटा : १० टक्के
व्यवस्थापन कोटा : ५ टक्के
अल्पसंख्यांक कोटा (केवळ अल्पसंख्यांक संस्थांसाठी) : ५० टक्के
--------------
प्रवेश प्रक्रिया शुल्क (माहिती पुस्तिकेसह) : १५० रुपये
----------------------
प्रवेशासाठी संकेतस्थळ : ँ३३स्र२://स्र४ल्ली.11३ँंे्रि२२्रङ्मल्ल.ल्ली३
.........
प्रवेश फेºयांचे नियोजन : १. शुन्य फेरी : नियमित फेºया सुरू होण्यापुर्वी असेल. द्विलक्षी अभ्यासक्रम व व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेचे प्रवेश केले जातील. या फेरीपासून व्यवस्थापन, इनहाऊस, अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेश सुरू होतील. 
२. तीन नियमित फेºया : शुन्य फेरीनंतर तीन नियमित फेºया होतील. यामध्ये सर्व शाखांचे प्रवेश गुणवत्ता, आरक्षण व विद्यार्थ्यांच्या पसंतीक्रमानुसार केले जातील. शुन्य फेरीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना या फेºयांमध्ये सहभागी होता येईल.
३. विशेष फेरी : नियमित ३ फेऱ्या संपल्यानंतर या फेऱ्यांमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना विशेष फेरीत सहभागी होता येईल.
४. एफसीएफएस फेऱ्या : विशेष फेरीनंतर प्रथम येणाºया प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) या तत्वानुसार या फेºयांमध्ये प्रवेश होतील. प्रवेश रद्द केलेले, प्रतिबंधित, प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी या फेऱ्या असतील.
......................
आवश्यक कागदपत्रे : 
खुल्या प्रवर्गासाठी : १. इयत्ता दहावीचे मुळ गुणपत्रक
२. शाळा सोडल्याचा मुळ दाखला
वैधानिक आरक्षणासाठी : १. इयत्ता दहावीचे मुळ गुणपत्रक
२. शाळा सोडल्याचा मूळ दाखला
३. मूळ जात प्रमाणपत्र
४. उत्पन्नाचा दाखला/ उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
विशेष/समांतर आरक्षणासाठी : १. इयत्ता दहावीचे मुळ गुणपत्रक
२. शाळा सोडल्याचा मूळ दाखला
३. विशेष आरक्षणास पात्र असल्याबाबतचे प्रमाणपत्र
जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांसाठी : जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळा सोडल्याच्या मूळ दाखल्यावर शाळेचा यू-डायस क्रमांक असल्याची खात्री करावी. हा क्रमांक नसल्यास दहावी उत्तीर्ण झालेल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांची प्रतिस्वाक्षरी घेणे आवश्यक आहे.
परदेशातून येणाºया विद्यार्थ्यांसाठी : संबंधित देशातील दूतावासाची सही व शिक्का असलेला दाखला व गणपत्रक सादर करावे.महाविद्यालयांचे झोन मुख्यालय -
१. सर परशुरामभाऊ महाविद्यालय
२. आबासाहेब गरवारे महाविद्यालय
३. मुक्तांगण कनिष्ठ महाविद्यालय, सहकारनगर
४. वसंतराव सणस माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, धायरीफाटा
५. नौरोसजी वाडिया महाविद्यालय
६. आकुताई कल्याणी साधना विद्यालय, हडपसर
७. मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर
८. जयहिंद महाविद्यालय, पिंपरी
९. श्री म्हाळसाकांत विद्यालय, आकुर्डी

Web Title: Admission to Class of 11th ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.