कृषी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 04:06 AM2020-12-02T04:06:26+5:302020-12-02T04:06:26+5:30

पुणे : न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने राज्यातील कृषी विद्यापीठाशी संलगन महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची रखडलेली प्रवेश प्रक्रिया सुरू ...

Admission process for agriculture course from today | कृषी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आजपासून

कृषी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आजपासून

Next

पुणे : न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने राज्यातील कृषी विद्यापीठाशी संलगन महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची रखडलेली प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक कृषी परिषदेतर्फे प्रसिध्द करण्यात आले आहे. त्यानुसार येत्या १ डिसेंबरपासून विद्यार्थ्यांची अंतरिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार असून येत्या १ जानेवारीपासून वर्ग सुरू होणार आहेत.

महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठांतर्गत ११, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत ९ , वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभरणी अंतर्गत ११ आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकणी कृषी विद्यापीठांतर्गत ७ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयातील प्रथम वर्षाची प्रवेश क्षमता १ हजार ३३५ आहे. कृषी परिषदेतर्फे एसईबीसी आरक्षासह विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकारण्यात आले होते; परंतु न्यायालयाच्या स्थगितीमुळे एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात यावा, असे परिषदेने स्पष्ट केले आहे.

-----------------------------------

प्रवेशाचे वेळापत्रक

अंतरिम गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे : १ डिसेंबर

तक्रार नोंदणीचा कालावधी : २ ते ५ डिसेंबर

अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे :- ७ डिसेंबर

पहिल्या प्रवेश फेरीच्या वाटपाची यादी : १० डिसेंबर

विद्यार्थ्यांचा रिपोर्टींगचा कालावधी : - ११ ते १४ डिसेंबर

दुसऱ्या प्रवेश फेरीच्या वाटपाची यादी : १६ डिसेंबर

विद्यार्थ्यांचा रिपोर्टींगचा कालावधी : १७ ते १९ डिसेंबर

तिस-या प्रवेश फेरीसाठी वाटप यादी : २१ डिसेंबर

विद्यार्थ्यांचा रिपोर्टींगचा कालावधी : २२ ते २४ डिसेंबर

चौथी फेरी : २८ ते ३० डिसेंबर

वर्ग सुरू होण्याचा दिनांक : १ जानेवारी २०२१

Web Title: Admission process for agriculture course from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.