कला संचालनालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:15 AM2021-08-18T04:15:54+5:302021-08-18T04:15:54+5:30
दहावीनंतर मूलभूत अभ्यासक्रम आणि इयत्ता बारावीनंतर रेखा व रंगकला, उपयोजित कला, आर्ट मास्टर, शिल्पकला व प्रतिमानबंध, अंतर्गत गृहसजावट, वस्त्रकाम ...
दहावीनंतर मूलभूत अभ्यासक्रम आणि इयत्ता बारावीनंतर रेखा व रंगकला, उपयोजित कला, आर्ट मास्टर, शिल्पकला व प्रतिमानबंध, अंतर्गत गृहसजावट, वस्त्रकाम (टेक्सटाइल), मातकाम (सिरॅमिक व पॉटरी), धातुकाम (मेटल अॅण्ड क्राफ्ट), कला शिक्षणशास्त्र पदविका (डीप.ए.एड) या पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. विद्यार्थी कला संचालनालयाच्या संकेतस्थळावरून महाविद्यालय, अभ्यासक्रम निवडू शकतात. तसेच आवश्यक कागदपत्रांच्या छायाप्रती २६ आॅगस्टपर्यंत अपलोड करू शकतात.
-----------
प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
- आॅनलाइन अर्ज नोंदणी करणे : २६ ऑगस्ट
- तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करणे : २८ ऑगस्ट
- तात्पुरत्या निवड यादीवर तक्रार सादर करणे : ३० ऑगस्ट
- अंतिम निवड यादी प्रसिद्ध करणे : १ सप्टेंबर
- मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेणे : १ ते ४ सप्टेंबर