"बीबीए इन हॉस्पिटॅलिटी अँड फॅसिलिटीज मॅनेजमेंट" प्रवेश प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:08 AM2021-06-20T04:08:45+5:302021-06-20T04:08:45+5:30

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ''डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायन्स'' (पुम्बा) मध्ये ''बीबीए इन हॉस्पिटॅलिटी अँड फॅसिलिटीज मॅनेजमेंट'' अभ्यासक्रमाच्या प्रवेश ...

Admission process for BBA in Hospitality and Facilities Management begins | "बीबीए इन हॉस्पिटॅलिटी अँड फॅसिलिटीज मॅनेजमेंट" प्रवेश प्रक्रिया सुरू

"बीबीए इन हॉस्पिटॅलिटी अँड फॅसिलिटीज मॅनेजमेंट" प्रवेश प्रक्रिया सुरू

Next

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ''डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायन्स'' (पुम्बा) मध्ये ''बीबीए इन हॉस्पिटॅलिटी अँड फॅसिलिटीज मॅनेजमेंट'' अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून, कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात.

पुणे विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यापीठातील ''डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायन्स'' मध्ये अनेक अभ्यासक्रम चालवले जातात. त्यापैकी हा ''बीबीए''चा तीन वर्षीय पदवी अभ्यासक्रम आहे. या पदवी अभ्यासक्रमासाठी कला, वाणिज्य, विज्ञान व व्होकेशनल या कोणत्याही शाखेतून इंग्रजी हा विषय घेऊन बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४५ टक्के, तर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण आवश्यक आहेत.

विभागप्रमुख डॉ. सुरभी जैन म्हणाल्या की, वेगाने वाढत असलेल्या क्षेत्रात संधी उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून या अभ्यासक्रमाची रचना केली आहे. यामध्ये प्रात्यक्षिक, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रत्यक्ष सहभाग, उद्योग जगताशी ओळख अशा अनेक अंगांचा समावेश केला आहे.

----------

''फॅसिलिटीज मॅनेजमेंट'' क्षेत्रात चांगले संबंध प्रस्थापित करण्यात विद्यापीठ यशस्वी झाले आहे. त्यामुळे नवपदवीधरांना नोकरीची संधीही उपलब्ध करून देता येऊ शकते. मात्र, या अभ्यासक्रमाची व्याप्ती पदवीपर्यंत मर्यादित नसून पुढील काळात ''फॅसिलिटी मॅनेजमेंट'' क्षेत्रात अनेक संधी निर्माण करणारी आहे.

- डॉ. प्रफुल्ल पवार, संचालक स्कूल ऑफ बिझनेस व कुलसचिव,

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

----- -

Web Title: Admission process for BBA in Hospitality and Facilities Management begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.