Admission: अकरावीला प्रवेश घेण्यासाठी उरले तीन दिवस; ३३ हजार जागा रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 12:35 PM2022-10-13T12:35:39+5:302022-10-13T12:40:01+5:30

आतापर्यंत सहा फेऱ्या पूर्ण...

Admission: Three days left for admission to 11th; 33 thousand seats vacant | Admission: अकरावीला प्रवेश घेण्यासाठी उरले तीन दिवस; ३३ हजार जागा रिक्त

Admission: अकरावीला प्रवेश घेण्यासाठी उरले तीन दिवस; ३३ हजार जागा रिक्त

Next

पुणे : अकरावीच्या आतापर्यंत सहा प्रवेश फेऱ्या झाल्या आहेत. आताच्या दैनंदिन गुणवत्ता फेरी अर्थात सतत विशेष फेरीला येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरीही आत्तापर्यंत ७८ हजार ४९६ विद्यार्थ्यांनी विविध महाविद्यालयात आपले प्रवेश निश्चित केले आहेत. तर प्रवेशासाठी अद्यापही ३३ हजार २५४ जागा उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी तीन दिवस उरले असून विद्यार्थ्यांना १५ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

पुणे, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहेत. आतापर्यंत तीन नियमित व तीन विशेष प्रवेश फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले. तरीही अजून काही विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दैनंदिन गुणवत्ता फेरी अर्थात सतत विशेष फेरी सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला संबंधित फेरीला ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती; परंतु, विद्यार्थ्यांनी अपेक्षित प्रतिसाद दिला नसल्याने ही मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत वाढवली.

प्रवेशासाठी निवड होऊनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयासाठी पूर्ण फेरीदरम्यान प्रतिबंधित केले जाते. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचा पुढील दिवसाच्या फेरीसाठी आपोआप विचार केला जाताे. त्याचबराेबर प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांनादेखील त्या महाविद्यालयासाठी प्रतिबंधित केले जाणार आहे. तसेच त्यांना यापुढे प्रवेश रद्द करण्याची परवानगी असणार नाही.

विशेष फेरी दिनांक १५ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. सुट्टीचे दिवस केवळ अर्ज करण्यासाठी वापरले जाणार असून कोटा आणि द्विलक्षी प्रवेश प्रक्रिया नेहमीप्रमाणे सुरू आहे. दुबार प्रवेश घेणारे अथवा जाणीवपूर्वक जागा अडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत कडक कारवाई केली जाईल, असेदेखील उपसंचालक कार्यालयातून सांगण्यात आले आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रिया दृष्टीक्षेपात

एकूण महाविद्यालये- ३१८

एकूण प्रवेशक्षमता - १,११,७५०

एकूण नोंदणी - १,०७,८४३

कोटा प्रवेशक्षमता - १५,४४३

कोटांतर्गत प्रवेश - १०,१५१

कॅप प्रवेशक्षमता - ९६,३१७

कॅपअंतर्गत अर्ज - ७६,०४९

एकूण प्रवेश - ७८,४९६

रिक्त जागा - ३३,२५४

Web Title: Admission: Three days left for admission to 11th; 33 thousand seats vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.