विद्यापीठाचे दूरस्थ प्रशालेचे प्रवेश सप्टेंबर महिनाअखेरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:12 AM2021-09-24T04:12:07+5:302021-09-24T04:12:07+5:30

काही कारणास्तव वेळेत पदवी व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण न घेऊ शकलेल्या महिला, नोकरी करून शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना ...

Admission to the university's distance school by the end of September | विद्यापीठाचे दूरस्थ प्रशालेचे प्रवेश सप्टेंबर महिनाअखेरीस

विद्यापीठाचे दूरस्थ प्रशालेचे प्रवेश सप्टेंबर महिनाअखेरीस

Next

काही कारणास्तव वेळेत पदवी व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण न घेऊ शकलेल्या महिला, नोकरी करून शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना विद्यापीठातर्फे बहिस्थ: अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जातात. या अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यतेने सुरू करण्यात आलेल्या मुक्त व दूरस्थ प्रशालेतर्फे बी.ए., बी.कॉम., एम.ए., एम.कॉम. या अभ्यासक्रमांना प्रवेश दिले जातात. त्यात आणखी काही अभ्यासक्रमांचा समावेश करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे.

वैभव जाधव म्हणाले, विद्यापीठातर्फे प्रवेशाची लिंक ३० सप्टेंबर पूर्वी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे. मागील वर्षी या अभ्यासक्रमास एकूण १३ हजार ३३५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी येत्या १५ डिसेंबरपर्यंत मुदत दिली जाणार आहे. एमकेसीएलच्या माध्यमातून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.

Web Title: Admission to the university's distance school by the end of September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.