ॲड. उमेश मोरेंच्या हत्याप्रकरणातील सहभागी वकिलाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:12 AM2021-03-25T04:12:46+5:302021-03-25T04:12:46+5:30

पुणे : शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाजवळून ॲड. उमेश मोरे यांचे अपहरण करून त्यांचा खून केल्याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या घनश्याम पोपट ...

Adv. The court rejected the bail application of the lawyer involved in the murder case of Umesh More | ॲड. उमेश मोरेंच्या हत्याप्रकरणातील सहभागी वकिलाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

ॲड. उमेश मोरेंच्या हत्याप्रकरणातील सहभागी वकिलाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Next

पुणे : शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाजवळून ॲड. उमेश मोरे यांचे अपहरण करून त्यांचा खून केल्याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या घनश्याम पोपट दराडे या वकिलाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. या प्रकरणात तो सहआरोपी असून, आरोपीला जामीन मंजूर केल्यास पुराव्यांमध्ये मोडतोड करणे आणि साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा युक्तिवाद सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी केला. तो मान्य करीत न्यायालयाने वकिलाचा जामीन अर्ज फेटाळला.

मे.जे पी अगरवाल कोर्टात दराडे याच्या जामीन अर्जावर बुधवारी (दि. २४) सुनावणी झाली. पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरातून १ ऑक्टोबर २०२०मध्ये ॲड. उमेश मोरे यांचे अपहरण करण्यात आले होते. सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडलेले ॲड. मोरे घरी न परतल्यामुळे त्यांचे बंधू प्रशांत मोरे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अखेर पोलिसांना ॲड. मोरे यांचा मृतदेह ताम्हिणी घाटात आढळून आला होता. या प्रकरणात पोलिसांनी कपिल विलास फलके, दीपक शिवाजी वांडेकर, ॲड. रोहित शेंडे यांच्यासह वकील घनश्याम दराडे याला अटक केली होती. आरोपी दरोडे यानेच ॲड. मोरे कोठे आहे याची माहिती आरोपी फलके आणि ॲड. शेंडे यांना दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणात दरोडे यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्या अर्जावर न्यायालयात सुनावणी झाली. आरोपीच्या वतीने ॲड .हर्षद निंबाळकर यांनी बाजू मांडली. त्यावर युक्तिवाद करताना ॲड. उज्वला पवार यांनी हा आरोपी केदार फलके याच्या सतत संपर्कात होता. ॲड. रोहित शेंडे याने अत्यंत योजनाबद्धपणे खुनाचा कट रचला. दराडे हा ॲड. शेंडे यांच्याकडे काम करीत होता. या कटामध्ये तो त्यांना सहकार्य करीत होता. या कटामध्ये त्याचा सहभाग असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज मंजूर करण़्यात येऊ नये. ॲड. पवार यांचा युक्तिवाद मान्य करीत न्यायालयाने दरोडे याचा जामीन अर्ज फेटाळला.

Web Title: Adv. The court rejected the bail application of the lawyer involved in the murder case of Umesh More

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.