ऍड. पुनाळेकर यांच्या जामिनावर मंगळवारी सुनावणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 08:07 PM2019-06-07T20:07:58+5:302019-06-07T20:09:17+5:30

सीबीआयने आपले म्हणणे सादर करण्यासाठी वेळ मागितल्याने ऍड. संजीव पुनावळेर यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी मंगळवारी (ता. 11) होणार आहे.

Adv. Punalekar's bail hearing on Tuesday |  ऍड. पुनाळेकर यांच्या जामिनावर मंगळवारी सुनावणी 

 ऍड. पुनाळेकर यांच्या जामिनावर मंगळवारी सुनावणी 

Next

पुणे, ता. 7 : सीबीआयने आपले म्हणणे सादर करण्यासाठी वेळ मागितल्याने ऍड. संजीव पुनावळेर यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी मंगळवारी (ता. 11) होणार आहे. शुक्रवारी अर्जावर सुनावणी होणार होती. मात्र सीबीआयने मुदत मागितल्याने ती पुढे ढकलण्यात आल्याची माहिती बचाव पक्षाचे वकील धर्मराज चंडेल यांनी दिली.


अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणी ऍड. पुनाळेकर आणि लिपिक विक्रम भावे यांना अटक करण्यात आली आहे. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली मुंबई हायकोर्टाचे वकील आणि या हत्याकांडातील आरोपींची बाजू मांडणारे वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना सीबीआयने अटक केली होती. 


संजीव पुनाळेकर यांच्यावर दाभोळकर हत्याप्रकरणी पुरावे नष्ट करणे, आरोपींना मार्गदर्शन करण्याचे आरोप आहेत तर विक्रम भावेवर आरोपींना दाभोलकरांची ओळख करुन देणे, प्रत्यक्ष घटनास्थळाची रेकी करणे हे आरोप ठेवण्यात आले आहेत. संजीव पुनाळेकर हे दाभोळकर हत्याकांडातील आरोपींचेही ते वकील आहेत. पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात आरोपींच्या जबानीतून पुनाळेकरचे नाव समोर आले होते. विक्रम भावे गडकरी रंगायतन स्फोटातील आरोपी आहे  सीबीआय कोठडीची मुदत संपल्याने दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.   

Web Title: Adv. Punalekar's bail hearing on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.