संत सोपानदेव पालखी सोहळ्याच्या प्रमुखपदी अ‍ॅड. त्रिगुण गोसावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:09 AM2021-06-20T04:09:08+5:302021-06-20T04:09:08+5:30

पालखी सोहळ्याबाबत अधिक माहिती देताना त्रिगुण गोसावी यांनी सांगितले की, शासनाने दिलेल्या नियमानुसारच सोहळा पार पडेल. सोमवार (दि. ५) ...

Adv. Trigun Gosavi | संत सोपानदेव पालखी सोहळ्याच्या प्रमुखपदी अ‍ॅड. त्रिगुण गोसावी

संत सोपानदेव पालखी सोहळ्याच्या प्रमुखपदी अ‍ॅड. त्रिगुण गोसावी

Next

पालखी सोहळ्याबाबत अधिक माहिती देताना त्रिगुण गोसावी यांनी सांगितले की, शासनाने दिलेल्या नियमानुसारच सोहळा पार पडेल. सोमवार (दि. ५) जुलै रोजी एकादशी दिवशी संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा आगमनाचा दिवस आहे. तर मंगळवार (दि. ६) जुलै रोजी संत सोपानदेव महाराज पालखी सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवण्याचा दिवस आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही पालखी सोहळा रद्द असल्याने प्रतीकात्मक स्वरूपात सोहळा पार पडेल. नियमाप्रमाणे दुपारी मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये (दि. ६) जुलै रोजी दुपारी प्रस्थान सुरू होईल आणि मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून सोहळा पुन्हा विसावेल.

तसेच मंदिरात नित्यनियमाप्रमाणे भजन, कीर्तन, काकडा, हरिपाठ सुरू राहील. तर सोमवार (दि. १९) जुलै रोजी दुपारी एक वाजता एसटी बसमधून पादुका क्षेत्र पंढरपूरकडे नेण्यात येईल. मागील वर्षी तिसऱ्या दिवशी पादुका परत आणल्या होत्या. मात्र, यावर्षी आषाढी एकादशी झाल्यानंतर सप्ताह केला जाईल आणि काला पार पडल्यानंतर पाचव्या दिवशी पादुका परत आणल्या जातील, असे त्रिगुण महाराज गोसावी यांनी सांगितले.

अ‍ॅड. त्रिगुण गोसावी यांची संत सोपानदेव पालखी सोहळाप्रमुखपदी निवड.

Web Title: Adv. Trigun Gosavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.