वकिलांची युक्ती : स्टीलचे पातेले वापरत हेल्मेट सक्तीचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 06:41 PM2019-01-03T18:41:43+5:302019-01-03T18:41:55+5:30
सविनय कायदेभंग... विविध प्रकारचे आंदोलने...अशा अनेक माध्यमांतून हेल्मेट सक्तीला विरोध करण्यासाठी पुण्यातील काही संघटना रस्त्यावर उतरले आहेत.
पुणे : सविनय कायदेभंग... विविध प्रकारचे आंदोलने...अशा अनेक माध्यमांतून हेल्मेट सक्तीला विरोध करण्यासाठी पुण्यातील काही संघटना रस्त्यावर उतरले आहेत. या सर्वांत स्टीलचे पातले हेल्मेट म्हणून वापरत असलेले शहरातील एक वकील सर्वांचे लक्षे वेधत आहे.
जिल्हा न्यायालयात प्रक्टीस करणारे अॅड. वाजेद खान-बीडकर यांनी हेल्मट सक्तीचा निषेंद नोंदविण्यासाठी ही आनोखी युक्ती केली आहे. हेल्मेट न वापरणा-या दुचाकीस्वरांवर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलीस मोठ्या प्रमाणावर कारवाई करीत आहेत. शहरात करण्यात आलेल्या या छुप्या हेल्मेट सक्ती विरोध करण्यासाठी अॅड. बीडकर यांनी ही शक्कल लढवली आहे. ते ३१ डिसेंबरपासून स्टीलच्या पातेल्याचा हेल्मेट म्हणून वापर करीत आहे. अॅड. बीडकर यांनी सांगितले की, हेल्मेट सक्ती करणे चुकीचे आहे. तसेच हेल्मेट कसे असावे या बाबत मोटार वाहन कायद्यात कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे ही असा प्रकारचे हेल्मेट वापरत आहे. हे बनविण्यासाठी मला १२० रुपये खर्च आला असून ते इतर हेल्मेटच्या तुलनेत मजबूत आहे, असा दावा त्यांनी केला आहे. संबंधित हेल्मेट वापरून द्यावे, असा अर्ज मी वाहतूक पोलिसांकडे केला आहे. हेल्मेट सक्ती करण्याआधी पोलिसांनी सर्वांना मोफत हेल्मेट द्यावे, अशी मागणी देखील त्यांनी केली.
दरम्यान आयएसआय नामांकन असलेले हेल्मेट वापरावे, असे आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे अॅड. खान वापरत असलेले हेल्मेट किती सुरक्षित आहे या बाबत प्रश्न उपस्थित होतो.